शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पैसे हडप करण्याचा प्रकार शिक्षण नव्हे क्रिडा विभागात, मंत्री दीपक केसरकरांनी दिली माहिती 

By अनंत खं.जाधव | Updated: April 24, 2024 17:53 IST

'ज्याने कृत्य केले ते लवकरच बाहेर येईल'

सावंतवाडी : शिक्षण विभागात कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला नसून क्रीडा विभागात तो प्रकार घडला आहे. मात्र, त्या संदर्भात मुंबई येथील मरिनड्राईव्ह पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. प्रत्येक खात्याचे वेगवेगळे सचिव असतात. त्यामुळे मी प्राथमिक माहिती घेतली असता क्रीडा विभागात तो प्रकार घडला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. मंत्री केसरकर हे बुधवारी सावंतवाडीत आले असता पत्रकारांशी परिषदेत बोलत होते.मात्र, ज्याने हे जे कृत्य केले आहे, त्याची चौकशी होणार असून बँक कडून सखोल माहिती घेण्यात येत आहे त्यानंतरच सत्य उजेडात येईल असे मंत्री केसरकर म्हणाले. मंत्रालयात धनादेशावर खोट्या सह्या करून पैसे हडप केल्याचा प्रकार घडला आहे. हा प्रकार शिक्षण व क्रीडा विभागात झाल्याची चर्चा आहे. याबाबत केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, शिक्षण व क्रीडा विभाग हे वेगवेगळे विभाग आहेत. दोन्ही विभागाचे सचिव वेगवेगळे आहेत. क्रीडा विभागात हा प्रकार झाला आहे, असे माझ्या सचिवांनी सांगितले. मात्र, बनावट धनादेशावर, सह्या करून बँकेमध्ये ते धनादेश वठवण्यात आले आहेत. मात्र, बनावट धनादेश कोणी बनवले हे लवकरच पुढे येणार आहे. घोटाळा शिक्षण विभागात झाला नाही.मात्र, शिक्षण व क्रीडा विभाग हे जरी एकत्र असले, तरी क्रीडा विभागाचे मंत्री हे वेगळे आहेत आणि तेच त्याबाबत काय ते उत्तर देऊ शकतात. मात्र, असा प्रकार होणे ही गंभीर बाब आहे असल्याचे केसरकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर Educationशिक्षण