शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

मालवण तालुक्यात २६ ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 16:15 IST

मालवण तालुक्यात ५५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे थेट सरपंच निवडीत २६ ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’ येणार असून साळेल व धामापूर ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जातीचा महिला उमेदवार विराजमान होणार आहे.

ठळक मुद्देराजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला गावागावात 'इलेक्शन फिवर'सात ग्रामपंचायती बिनविरोध कोणाची प्रतिष्ठा, तर कोणाचे अस्तित्व पणाला

सिद्धेश आचरेकरमालवण :  तालुक्यात ५५ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत आहे. या वर्षीपासून जनतेतून थेट सरपंच निवड असल्याने ग्रामपंचायत निवडणुकांना ‘विधानसभे’च्या निवडणुकांप्रमाणे महत्व आले आहे. राजकीय पक्षांनी उमेदवारांची केलेली  मोर्चेबांधणी पाहता निवडणुकीच्या निमित्ताने ‘राजकीय रंग’ उधळण्यास सुरुवात झाली आहे.

मालवण तालुक्यातील सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून १६ आॅक्टोबर रोजी होणाºया मतदाना दिवशी ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी सरपंच पदासाठी १४८ तर २६१ सदस्य जागेसाठी ६५९ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे ठाकले आहेत. थेट सरपंच निवडीत २६ ग्रामपंचायतींवर ‘महिलाराज’ येणार असून साळेल व धामापूर ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसूचित जातीचा महिला उमेदवार विराजमान होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावागावात ‘इलेक्शन फिवर’ पाहायला मिळत आहे. जुन्या-नव्यांच्या वादाबरोबरोबर राजकीय पक्षांच्या विविध आघाड्यांचीही ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत आणली आहे. सध्या सर्वत्र भातकापणीचा हंगाम असला तरी गावनिहाय प्रचाराला वेग आला आहे.

तालुक्यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे समर्थ विकास पॅनेल, शिवसेनेचे वैभव विकास पॅनेल तर भाजप पुरस्कृत पॅनेल रिंगणात असून ब?्याच ग्रामपंचायतींमध्ये राजकीय पक्षांच्या आघाड्यांंमधून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष उमेदवारही विजयाच्या दृष्टीने ताकद लावत आहेत. अपक्ष उमेदवारांची निर्णायक मतेही धक्कादायक निकाल देणारी ठरणार आहेत. शनिवार १४ रोजी सायंकाळी ५ : ३०  वाजता जाहीर प्रचाराची अंतिम मुदत असणार असून १५ रोजी निवडणूक होईल. 

मालवण तालुक्यातील ६३ पैकी ५५ गावांची ग्रामपंचायत निवडणूक होत आहे. तालुक्यात सद्यस्थिती पाहता बहुतांशी ग्रामपंचायती राणे समर्थक पदाधिका?्यांच्या ताब्यात आहेत. शिवाय नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकात तत्कालीन कॉंग्रेस तथा राणे समर्थकांच्या गटाने घवघवीत यश संपादन केले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणे समर्थकांच्या गोटात आत्मविश्वास वाढला आहे.

नारायण राणे यांनी काँग्रेसला ‘घटस्फोट’ दिल्यांनतर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यामुळे काँग्रेसमधून बाहेर पडलेली राणेंची सर्व टीम स्वाभिमान पक्षाचे काम जोमाने करताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींवर एककलमी ताबा असलेल्या राणे समर्थकांना आपला झेंडा अबाधित ठेवण्याचे कसब दाखवावे लागणार आहे. १७ रोजी होणाºया मतमोजणीत कुठल्या पक्षाचे पॅनल आघाडी मारणार हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहेत.

नगर पालिका तसेच पंचायत समिती- जिल्हा परिषद निवडणुकांप्रमाणे ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र खुलेआम चाचपणी शिवसेनेकडून करण्यात आली नाही. आमदार वैभव नाईक तसेच जिल्हा परिषद सदस्य हरी खोबरेकर, तालुकाप्रमुख बबन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारांची अंतर्गत चाचपणी करण्यात आली असून बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळून ४८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासह सदस्यांची यादी तयार करण्यात आली आहे.

अद्यापही आमदार नाईक यांनी आपल्या उमेदवारांची यादी गोपनीय ठेवली आहे. ‘पार्लमेंट टू पंचायत’चा नारा देणाºया भाजपनेही या निवडणुकीत प्रथमच आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप पुरस्कृत १४ सरपंच पदाचे उमेदवार तर १०० हून अधिक सदस्य निवडणूक रिंगणात उभे आहेत, काही ठिकाणी निर्विवाद यश मिळेल, असा आशावाद भाजपच्या गोटातून व्यक्त होत आहे. 

‘काटे की टक्कर’ देणाºया लढतीतालुक्यात उर्वरित ४८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ४८ उमेदवार 'आमने-सामने' आहेत.  नऊ ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी तर अन्य ठिकाणी तिरंगी-चौरंगी लढती होणार आहेत. शिवाय ४८ ग्रामपंचायतींच्या २६१ जागांसाठी ६५९ सदस्य उभे ठाकल्याने ‘काटे की टक्कर’ लढती होणार आहेत.

काही गावांमध्ये कुटुंबातीलच व्यक्ती निवडणूक रिंगणात असून पक्षीय आघाड्यांंच्या पाठिंब्यावर प्रचारालाही वेग आला आहे. आमदार वैभव नाईक यांनी तालुक्यातील सर्व गावागावात उमेदवारांना भेटण्याचा धडाका लावला आहे. तर माजी खासदार निलेश राणे यांनीही तालुक्यातील काही भाग पिंजून काढत कार्यकर्त्यांना बळ दिले. तर बंदर विकास राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही तालुका दौरा केला आहे. तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका राजकीय पक्षांचे गावनिहाय अस्तित्व सिद्ध करणारे ठरणार आहेत. 

सात ग्रामपंचायती बिनविरोधतालुक्यातील रामगड, पोईप, बांदिवडे बुद्रुक (कोईल), खोटले, आंबेरी, घुमडे या सहा ग्रामपंचायती निवडणुकीपूर्वीच बिनविरोध झाल्या आहेत. तर महान गावात सरपंच पदासाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नसला सदस्य जागेच्या सर्व जागा बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे महान गावात सरपंच पद रिक्त राहणार आहे.

सहा बिनविरोध ग्रामपंचायतीपैकी पोईप व रामगड या ग्रामपंचायतीवर शिवसेना दावा केला असून आंबेरी, घुमडे, खोटले, महान, बांदिवडे बुद्र्रुक या ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा राणे समर्थक म्हणजेच समर्थ विकास पॅनेलने दावा केला आहे. बिनविरोध झालेल्या सात ग्रामपंचायतीतील सरपंच तसेच सदस्यांच्या जागेच्या ५१ जागा बिनविरोध झाल्या आहेत.  त्यामुळे ४८ ग्रामपंचायतीसाठी सरपंच पदासह ८०७ सदस्य नशीब आजमावणार असून बºयाच ग्रामपंचायतींमध्ये युवा वगार्ची छाप दिसून येणार आहे. 

 कोणाची प्रतिष्ठा, तर कोणाचे अस्तित्व पणालास्थानिक शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. लोकसभा-विधान सभा निवडणुकीनंतर झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेचा करिष्मा चालला नव्हता. त्यामुळे आगामी मोठ्या निवडणुकांच्या दृष्टीने ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल शिवसेनेला महत्वपूर्ण ठरणार आहेत.

तत्कालीन काँग्रेस पक्षाची लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पीछेहाट झाली होती. मात्र ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीवर एकहाती सत्ता मिळवली. आता काँग्रेसला रामराम करून निवडणुकांच्या तोंडावर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या दृष्टीने राणे समर्थकांना ग्रामपंचायतीवरचा झेंडा कायम ठेवण्यासाठी अस्तित्व पणाला लावण्याची वेळ आली आहे. जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनीही नियोजनपूर्वक रणनीती आखली असून राणे याना ‘विजयोत्सवाची’दिवाळी भेट देण्यासाठी सज्ज झाले आहेत. 

२६ ग्रामपंचायतींच्या चाव्या महिलांच्या हाती५५ ग्रामपंचायती पैकी २६ ठिकाणी सरपंचाचे आरक्षण हे महिला प्रवगार्साठी राखीव ठेवण्यात आले. यात अनुसुचीत जातीसाठी धामापूर व साळेल, नागरिकांचा मागास प्रवगार्साठी (ओबीसी) तळगाव, सुकळवाड, कांदळगाव, वायंगणी तर खुल्या प्रवगार्साठी सजेर्कोट, मियार्बांदा, मालोंड, खोटले, वरची गुरामवाडी (कट्टा ), वेरळ, तारकर्ली-काळेथर, देवबाग, चाफेखोल, नांदोस, राठीवडे, देवली, बांदिवडे बुद्र्रुक, आंबडोस, पोईप, आंबेरी, गोठणे, असरोंडी, कोळब, रेवंडी, आनंदव्हाळ या २६ ठिकाणी जनतेतून निवडून आलेले महिला सरपंच गावाचा गाडा हाकणार आहेत. यातील सरपंच पदासाठीच्या तीन ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्या आहेत. 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकNilesh Raneनिलेश राणे