शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: बेईमानी करणाऱ्यांना जनतेनं चोख उत्तर दिलं- नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 17:34 IST

सिंधुदुर्गातल्या कणकवली मतदारसंघातून सतीश सावंत यांचा पराभव करत नितेश राणेंनी विजय मिळवला.

कणकवली- सिंधुदुर्गातल्या कणकवली मतदारसंघातून सतीश सावंत यांचा पराभव करत नितेश राणेंनी विजय मिळवला. त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणेंनीही या विजयावर सूचक प्रतिक्रिया दिली आहे. बेईमानी करणाऱ्यांना जनतेचं चोख उत्तर दिल्याची भावना नारायण राणेंनी व्यक्त केली आहे.या निवडणुकीत नितेश राणेंनी 20 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे उमेदवार नितेश राणे यांनी मताधिक्यांची घोडदौड कायम राखली आहे. 19व्या फेरीअखेर 25,203 मताधिक्क्यांची निर्णायक आघाडी घेतल्यानंतर त्यांचा विजय झाला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी कणकवलीत फटाके फोडून जल्लोष साजरा केलाय.नारायण राणेंबरोबर 25 वर्षं राहिल्यानंतर सतीश सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली होती. तसेच नितेश राणेंच्या एकतर्फी वाटणाऱ्या निवडणुकीलाही सतीश सावंतांच्या उमेदवारीमुळे रंगत आली होती. शिवसेनेनंही नितेश राणेंना पाडण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली होती, युतीत भाजपाच्या वाट्याचा असलेला या मतदारसंघातही शिवसेनेनं अधिकृत उमेदवार म्हणून सतीश सावंतांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019