शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019: राणेंना भाजपाने विचारमंथनाचे धडे द्यावेत-  दीपक केसरकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 18:40 IST

पण आता त्यांनाच स्वत: चा पक्ष विसर्जित करावा लागला.

सावंतवाडी : नारायण राणे हे दुस-यांचे पक्ष विसर्जित करण्यास निघाले होते. पण आता त्यांनाच स्वत: चा पक्ष विसर्जित करावा लागला. हा सर्व नियतीचा खेळ असून, माझी लढाई ही प्रवृत्तीशी आहे. जर भविष्यात राणेंना भाजपाच्या विचारमंथन शिबिरात सहभागी करून घेतले आणि त्यांची विचारधारा बदलली तर त्यांच्याशी असलेला माझा राजकीय संघर्षही संपेल, असे मत राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी मांडले. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी त्यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले. मंत्री केसरकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अनेक पक्ष संपविण्याची घोषणा केली. शिवसेना विसर्जित करण्याची घोषणा केली. पण नियतीच्या मनात वेगळेच होते. त्यांना भाजपसारख्या पक्षात प्रवेश मिळावा म्हणून अडीच वर्षे वाट बघावी लागली. अडीच वर्षांनंतर त्यांना स्वत: चा पक्षही विसर्जित करावा लागला, यासारखे दुर्दैव ते काय, असा सवाल मंत्री केसरकर यांनी केला.जिल्ह्यातील जनता सुज्ञ आहे. तुम्ही माझ्या विरोधात काय ते एकत्र या, पण सावंतवाडीत त्याचा काही उपयोग होणार नाही, असे मतही मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले. माझी लढाई ही राणेंशी व्यक्तिगत नाही. कोणत्याही घटनेवरून त्यांच्या कुटुंबात भावा-भावात वाद व्हावा ही अपेक्षा माझी मुळीच नाही. मी कुटुंंब फोडून राजकारण करणारा नाही. सावंतवाडीत तेवढी संस्कृतता बाळगली जाते. माझी लढाई ही प्रवृत्तीशी आहे.राणे सर्वसामान्य जनतेला देत असलेल्या त्रासाविरोधात होती. पण आता ते भाजपात प्रवेश करत आहेत. ते भाजपाचे सदस्य झाले आहेत. त्यांनी आता भाजपाची विचारधारा स्वीकारावी. भाजपाने त्यांना विचारमंथनाचे धडे द्यावेत, त्यातून असलेला राग नाहीसा होईल. त्यानंतरच माझा राणेंशी असलेला राजकीय संघर्ष संपेल, असे मत यावेळी मंत्री केसरकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019