शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

..तर बैलगाडीतूनच करावा लागणार प्रचार; निवडणूक विभागाने निश्चित केले वाहनांचे दर

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: October 26, 2024 18:57 IST

महेश सरनाईक सिंधुदुर्ग : उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. ...

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : उमेदवारांना मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार करणे आवश्यक आहे. प्रचारासाठी प्रामुख्याने विविध प्रकारच्या वाहनांचा उपयोग केला जातो. कोणत्या वाहनाचे दर दिवसाला किती रूपये भाडे राहील हे निवडणूक विभागाने निश्चित केले आहे. त्यानुसार टाटा सुमो, बोलेरो, काळी-पिवळी, जीप यांचे इंधनासह प्रति दिवसाचे भाडे ३ हजार ८०० रूपये तर बैलगाडी, घोडागाडी प्रतितास २ रूपये दर ठरविण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक विभाग याकडे लक्ष ठेवणार असून त्यानुसार उमेदवारांचा खर्च निश्चित केला जाणार आहे.

उमेदवाराला ४० लाख रूपयांची मर्यादानिवडणुकीदरम्यान मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला प्रचार करावा लागतो. यासाठी वाहने भाड्याने घेऊन त्यावर ध्वनिक्षेपक लावला जातो. तसेच बॅनर, पोस्टर व वाहनाला बॅनर, पोस्टर बांधून उमेदवार प्रचार करतात. निवडणुकीदरम्यान, खर्चाची मर्यादा पाळणे उमेदवाराला आवश्यक आहे. यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ४० लाख रूपयांची मर्यादा देण्यात आली आहे.

दर दिवशीचा खर्च सादर करण्याची अटदर दिवशीचा खर्च उमेदवाराला निवडणूक विभागाकडे सादर करावा लागतो. खर्चाची मर्यादा ओलांडल्यास निवडून येवूनही उमेदवारांचे पद धोक्यात येण्याची शक्यता अधिक आहे. निवडणूक खर्चाचा हिशेब जुळवताना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी निवडणूक विभागाने जवळपास सर्वच प्रकारच्या वाहनांचे दर ठरवले आहेत. सोबतच इंधनासह व इंधनाशिवाय असेसुद्धा वर्गीकरण केले आहे. त्यानुसार निवडणूक खर्च विभागाला सादर करणे आवश्यक आहे.

४० सीटर प्रवासी वाहनाचे भाडे दहा हजार रूपये

  • ४० सीटर प्रवासी वाहनाचे भाडे दिवसाला ७ हजार ७०० रूपये तर इंधनासह १० हजार ४०० रूपये ठरविण्यात आले आहे.
  • १८ सीटर वाहनासाठी दिवसाचे इंधनाशिवाय भाडे ४ हजार ६२५ रूपये तर इंधनासोबत ५ हजार ७६० रूपये ठरविले आहे. ५० लीटर वाहनाचे इंधनासोबतचे भाडे २२ हजार ९५० रूपये ठरविण्यात आले आहे.

सायकल रिक्षा प्रतितास २ रूपये कुठे मिळते साहेब ?

  • काही उमेदवार शहरात सायकल रिक्षाच्या माध्यमातून प्रचार करतात. त्यासाठी इंधन लागत नसल्याने त्याचे भाडे कमीच ठेवण्यात आले आहे.
  • निवडणूक विभागाने सायकल, रिक्षा, घोडागाडी, बैलगाडी यासाठी प्रतितास केवळ २ रूपये भाडे ठरविले आहे. ४०० रूपये दिवसाची मजुरी दिल्याशिवाय मजूर मिळत नाही. अशास्थितीत सायकल, सायकल रिक्षा, बैलगाडी केवळ दोन रूपये प्रतितास या दराने मिळणार काय ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मालवाहू वाहनासाठी पाच हजार रूपये

  • मालवाहू हलक्या वाहनाचे इंधनाचे भाडे ५ हजार २६० रूपये ठरविण्यात आले आहे. १० चाकी वाहन असल्यास १२ हजार ८०० रूपये, १२ ते १४ चाकी वाहन १३ हजार ६०० रूपये, १६ चाकी वाहनाचे भाडे २५ हजार ७०० रूपये ठरविले आहेत. त्यानुसार निवडणूक खर्च सादर करावा लागणार आहे.
  • कितीही रूपये दिले तरी निवडणूक विभागाकडे खर्च सादर करतेवेळी निवडणूक विभागाने ठरवून दिलेल्या दरानेच खर्च सादर करायचा असतो.

ऑटोरिक्षा एक हजार रूपये दिवसऑटोरिक्षाच्या माध्यमातूनही प्रचार केला जातो. निवडणूक विभागाने इंधनासह ऑटोरिक्षाचा दर प्रतिदिवस एक हजार रूपये, सायकल रिक्षा प्रतितास २ रूपये, दुचाकी प्रतितास २० रूपये, ट्रॉलीसोबत ट्रॅक्टर प्रतिदिवस ३ हजार रूपये दर ठरविला आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग