शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे, पण..; दीपक केसरकरांचे राज ठाकरेंना प्रत्युत्तर 

By अनंत खं.जाधव | Updated: November 5, 2024 16:36 IST

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेला लाथ मारून बाजूला गेले. सत्ता कोण सोडत नाही पण ते त्यांनी धारिष्ट्य दाखवले. ...

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सत्तेला लाथ मारून बाजूला गेले. सत्ता कोण सोडत नाही पण ते त्यांनी धारिष्ट्य दाखवले. शिवसेना ही बाळासाहेबांची मालमत्ता खरे आहे पण त्याच्या विचाराचे वारस शिंदे हेच आहेत. म्हणूनच लोकांनी आमच्यावर भरभरून प्रेम केले. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्या बरोबर जनता राहत नाही हे लोकसभा निवडणुकीत बघितलं आहे असे जोरदार प्रत्युत्तर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना दिले.राज ठाकरे यांनी शिवसेना नाव व चिन्ह ही बाळासाहेबांची मालमत्ता आहे. एकनाथ शिंदेंची नाही अशी टीका केली होती. त्याला केसरकर यांनी प्रत्युत्तर दिले. राज ठाकरे हे मोठे नेते आहेत. ते काय बोलले यावर माझ्यासारख्या छोट्या माणसाने बोलणे योग्य नाही. पण एकनाथ शिंदे यांनी सत्तेतून बाहेर गेले. लोक सत्ता सोडायला तयार नसतात. पण त्यांनी धाडस करून दाखवले. हा विचार वारसातूनच येत असतात. ..अन् युवराज काँग्रेसच्या नेत्यांसोबत गळाभेट घेतातस्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बाबतीत तत्कालीन काँग्रेसचे मंत्री अपशब्द बोलले त्यांना बाळासाहेबांनी मुंबईमध्ये येऊ दिले नाही. पण आज याच काँग्रेसच्या नेत्यांसोबत युवराज गळाभेट घेतात. हे येथील जनता सहन करणार नाही असेही केसरकर म्हणाले. शरद पवार यांच्या निवृत्तीच्या संकेतावरही केले भाष्य खासदार शरद पवार यांनी दिलेल्या निवृत्तीच्या संकेतावरही मंत्री केसरकर यांनी भाष्य केले. शरद पवार हे जेष्ठ नेते आहेत त्यांच्याबाबत मी बोलणे योग्य नाही. पण त्यांनी यापूर्वीही निवृत्तीबाबत निर्णय घेतला होता असे ते केसरकर म्हणाले...त्याची चौकशी करावी लागेलसावंतवाडी मतदारसंघात सध्या काही अप्रवृत्ती आलेल्या आहेत त्यांना येथील जनतेने वेळीच घरी पाठवणे गरजेचे आहे. काही जणांवर जमीन घोटाळ्यांचे आरोप आहेत. अशांवर पोलिसांनी अद्याप पर्यंत कशी काय कारवाई केली नाही याची चौकशी करावी लागेल. जमिनीचे मोठे घोटाळे आहेत पोलिसांनी हे प्रकरण आर्थिक गुन्हा शाखेकडे पाठवले पाहिजे होते पण तसे झाले नाही. सध्या निवडणुकीचा कालावधी आहे. त्यामुळे यावर आम्ही खोलात जात नाही पण निवडणूक संपतात याबाबत चौकशी करण्याची मागणी करू असेही मंत्री केसरकर म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४sawantwadi-acसावंतवाडीDeepak Kesarkarदीपक केसरकर Raj Thackerayराज ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024