शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला भकास केले, आदित्य ठाकरे यांची टीका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 15:21 IST

देवगड येथे महाविकास आघाडीची सभा

देवगड : गद्दारी करून चिन्ह, पक्ष, नाव चोरलात, हे करून महाराष्ट्राच्या विकासासाठी काय केलात? महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पाठवून महाराष्ट्राला भकास केलात, अशी बोचरी टीका देवगड येथील जाहीर प्रचारसभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली.कणकवली विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांच्या प्रचारार्थ देवगड सारस्वत बँकेसमोरील पटांगणात आयोजित प्रचारसभेत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संदेश पारकर, उद्धवसेना नेते गौरीशंकर खोत, सतीश सावंत, परशुराम उपरकर, अतुल रावराणे, सुशांत नाईक, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण टेंबुलकर, आपचे जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर आदी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन वर्षांपूर्वी वडील उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसतानाही, त्यांच्या दोन शस्त्रक्रिया झाल्या. अशा परिस्थितीत गद्दारी करून त्यांना मुख्यमंत्रिपदावरून दूर करण्याचे काम केले. आज मुंबईचे अस्तित्व कोकणी माणसामुळे टिकून आहे. बाळासाहेबांपासून कोकण आणि शिवसेना असे अतूट नाते आहे. परिवर्तन आवश्यक आहे. परिवर्तनासाठी तुम्हाला मशाल पेटवावी लागेल, असे आवाहन ठाकरे यांनी केले.यावेळी स्वप्निल धुरी, किरण टेंबुलकर, विवेक ताम्हणकर, ॲड.प्रसाद करंदीकर यांनी विचार मांडले. सभेपूर्वी जामसंडे ते देवगड अशी बाइक रॅली काढण्यात आली. सूत्रसंचालन प्रसाद दुखंडे यांनी केले. या सभेनंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आचरा, कुडाळ तालुक्यातील माणगाव आणि वेंगुर्ला येथेही प्रचार सभा झाल्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kankavli-acकणकवलीAditya Thackreyआदित्य ठाकरेthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024