शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

गुरूवर्य जेवढी टिका करतील तेवढे प्रेम वाढणार; विशाल परब यांचे नारायण राणेंना प्रत्युत्तर

By अनंत खं.जाधव | Updated: November 17, 2024 20:15 IST

अपक्ष उमेदवार विशाल परब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील ऑडिओ किल्प व्हायरल झाली त्यावर 23 नोव्हेंबर नंतर बोलणार असे ही परब यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी : माझ्यावर टिका करणारे हून माझे गुरूवर्य असून त्यांनी शिष्यावर कितीही टिका केली तरी त्यांना मी उत्तर देणार नाही.गुरू हा गुरूच असतो ते जेवढी टिका करतील तेवढे त्याच्याबद्दल माझे प्रेम वाढेल अशा शब्दांत सावंतवाडीतील अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिले.

तसेच अपक्ष उमेदवार विशाल परब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील ऑडिओ किल्प व्हायरल झाली त्यावर 23 नोव्हेंबर नंतर बोलणार असे ही परब यांनी स्पष्ट केले.

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. शनिवारी सावंतवाडीत झालेल्या प्रचार सभेत खासदार राणे यांनी नाव न घेता विशाल परब यांच्यावर सडकून टिका केली होती.त्याला परब यांनी प्रत्युत्तर दिले.

परब म्हणाले,प्रथमच एक अपक्ष उमेदवार सत्ताधारी पक्षाला जड जातना दिसत आहे.त्यामुळेच माझ्यावर नाहक आरोप केले जात आहे.पण मी घाबरणार नाही कारण माझ्या पाठीशी सावंतवाडीतील जनता आहे.त्याचे प्रेम मला मोठ्याप्रमाणात मिळत आहे.असे सांगत परब यांनी मी कुणावर टिका करणार नाही असे यावेळी स्पष्ट केले.

माझ्यावर माझे गुरू खासदार नारायण राणे यांनी टिका केली.ही टिका मी प्रेमाने स्वीकारतो ते जेवढी टिका करणार तेवढी लोक अजून माझ्यावर प्रेम करतील केलेल्या टिकेला मतदार मतपेटीतून प्रेमाने उतराई करतील असा विश्वास परब यांनी व्यक्त केला.तसेच राणेंचे नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिले.

तसेच मागील काहि दिवसांपासून अपक्ष उमेदवार विशाल परब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील ऑडिओ किल्प व्हायरल झाली होती यावरून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती.या किल्प वर परब यांना विचारले असता मी यावर आता बोलणार नाही मात्र यावर 23 नोव्हेंबर नंतर नक्कीच बोलणार असे ही परब यांनी स्पष्ट केले आहे.यावेळी जयेश राणे,साद शेख,उमाकांत वारंग आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४thane kokan regionThane Kokan Assembly Election 2024sawantwadi-acसावंतवाडीNarayan Raneनारायण राणे Narayan Raneनारायण राणे