शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणं युद्धासारखंच!
2
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
3
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
4
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
5
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
6
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
7
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
8
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
9
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
10
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
11
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
12
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
13
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
14
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
15
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
16
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
17
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
18
भारतात फुलटाइम स्टॉक ट्रेडर बनण्यासाठी जवळ किती पैसे असायला पाहिजे?
19
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
20
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला

Vidhan Sabha Election 2024: ईव्हीएमवर नजर ठेवणार ‘जीपीएस’, अनुचित प्रकार टाळता येणार

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: November 9, 2024 18:44 IST

मतदानयंत्राची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर बसविणार यंत्रणा

महेश सरनाईकसिंधुदुर्ग : विधानसभेसाठी २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी वापरण्यात येणारे मतदान यंत्र अर्थात ईव्हीएमवर करडी नजर ठेवण्यासाठी यंत्र वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस (ग्लोबल पोजिशनिंग सिस्टीम) बसविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.निवडणूक यंत्रणेत यापूर्वी जीपीएस प्रणालीचा वापर केला जात नव्हता. तो यंदा लोकसभा निवडणुकीपासून केला जात आहे. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आता थेट नियंत्रण ठेवता येणे शक्य झाले आहे. एसटी महामंडळावरील सुसज्ज बसेस या ईव्हीएम व कर्मचाऱ्यांसाठी घेतल्या जाणार आहेत.प्रशासनाने निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठीदेखील विविध उपक्रम राबविले जात आहेत. जास्तीत जास्त मतदारांना मतदानाचा आपला हक्क बजावण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. विविध चित्ररथांव्दारे जनजागृतीची मोहीम राबविण्यात येत आहे. दुचाकी रॅली, विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली काढून मतदानाचा पवित्र हक्क बजावण्यासाठी प्रशासन सतर्क आहे.

मशिनमध्ये बिघाड झाल्यास अनुचित प्रकार टाळता येणे शक्यजिल्हा प्रशासनाकडून एक स्वतंत्र जीपीएस बसविले जाणार आहे. रस्त्यात जाताना किवा येताना बस बंद झाली किवा मशीनमध्ये बिघाड झाला तर यामुळे अनुचित प्रकार टाळता येणे सहज शक्य होणार आहे. जीपीएसमुळे तत्काळ मदत होते. याचा फायदा प्रशासनाला होणार असल्याचे सांगण्यात आले.

कंट्रोल रूम तयार होणार

  • जीपीएससाठी स्वतंत्र कंट्रोल रूम तयार केले जाणार आहे. कंट्रोल रूमचा कंट्रोल कुणाकडे दिला जाणार, याबाबतच्या नियोजनासाठी जिल्हा प्रशासन, पोलिस व आरटीओ यांची बैठक होणार आहे.
  • यामध्ये बसची संख्या, जीपीएस व कंट्रोल रूम यावर शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती आहे.
टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ratnagiri-acरत्नागिरीkankavli-acकणकवलीEVM Machineईव्हीएम मशीनthane kokan regionThane Kokan Assembly Election 2024