शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

आंबोली, गेळे येथील जमिन प्रश्नात घातला खो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 10:34 IST

सावंतवाडी : आंबोली व गेळे कबुलायतदार जमीन प्रश्न सुटण्याच्या शेवटच्या टप्प्यात असताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महसूलमंत्र्यांना त्रिसदस्यीय समिती ...

ठळक मुद्देअन्यथा पालकमंत्र्यांविरोधात काम करुकबुलायतदार गावकर समन्वय कृती समितीचा इशारा

सावंतवाडी : आंबोली व गेळे कबुलायतदार जमीन प्रश्न सुटण्याच्या शेवटच्या टप्प्यात असताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महसूलमंत्र्यांना त्रिसदस्यीय समिती नेमण्याबाबत निवेदन देऊन खो आणण्याचा प्रयत्न केला आहे. याला आमचा विरोध असून त्यांनी हे निवेदन मागे घ्यावे. अन्यथा येणाऱ्या निवडणुकांवर बहिष्कार घालून त्यांच्या विरोधात काम करु, असा इशारा कबुलायतदार गावकर समन्वयक कृती समितीच्यावतीने येथे दिला.आंबोली व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन प्रश्नाबाबत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महसूल मंत्री चंद्र्रकांत पाटील यांची गावातील कृती समितीला कुठलीही पूर्वकल्पना न देता भेट घेतली.

यावेळी त्यांनी आंबोली, चौकुळ व गेळे या तिन्ही गावातील जमीन प्रश्न वेगळा असल्याने त्याला वेगवेगळे निकष लावावेत व त्रिसदस्यीय समिती नेमून हा प्रश्न निकाली काढावा, असे निवेदन सादर केले. या प्रकाराने कबुलायतदार गावकर समन्वयक कृती समितीने आंबोली शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेत पालकमंत्री केसरकर यांच्या भूमिकेवर जोरदार टीका केली.यावेळी कृती समिती सदस्य भारतभूषण गावडे, उपाध्यक्ष उल्हास गावडे, रामचंद्र्र गावडे, प्रकाश गावडे, गजानन पालेकर, महेश पावस्कर, मनोहर गावडे, भीमसेन गावडे, महादेव गावडे, पांडुरंग गावडे, योगेश नाटलेकर, ज्ञानेश्वर राऊत, विष्णू कालेलकर, अंकुश कदम आदी तिन्ही गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी रामचंद्र्र गावडे म्हणाले, आंबोली व गेळे येथील जमीन प्रश्न सोडवण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी गेली दहा वर्षे आम्हाला झुलवत ठेवले. मात्र माजी आमदार राजन तेली यांनी यासंदर्भात प्रामाणिक प्रयत्न करून हा प्रश्न सोडविण्यासाठी महसूलमंत्री चंद्र्रकांत पाटील यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.

याच माध्यमातून जमीन प्रश्न सुटण्याच्या अंतिम टप्प्यात असताना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी यासंदर्भात महसूलमंत्र्यांची भेट घेत त्रिसदस्य समिती नेमण्यात यावी, असे निवेदन त्यांना दिले. त्यामुळे हा प्रश्न पुन्हा एकदा रेंगाळला असून, केसरकर यांच्या या भूमिकेचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.

मुळात कबुलायतदार गावकर समन्वयक कृती समितीला विश्वासात न घेता त्यांनी महसूल मंत्र्यांची भेट घेत आमचा अपमान केला असून, त्यांच्या भूमिकेला आमचा ठाम विरोध आहे.भारतभूषण गावडे म्हणाले, ग्रामसभेच्या निर्णयाप्रमाणेच ६३० पात्र कुटुंबांना विचारात घेऊन वर्ग १ प्रमाणे त्याचे वाटप व्हावे, खासगी वने कमी करण्याकरिता प्रस्ताव केंद्र्र शासनाकडे सादर करावा.

पात्र कुटुंबास जमीन वाटप झाल्यानंतर उर्वरित जमिनीचा वापर सार्वजनिक सुविधा, गावठाण, गायरान व इतर पर्यटन विषयक बाबी करण्यात याव्यात. मेनन अँड मेनन कंपनीला ग्रामस्थांनी दिलेल्या व सध्या वापरात नसलेल्या २१६ एकर जमिनीचा विचार व्हावा, या आमच्या प्रमुख मागण्या राहणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग