शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

सागरी संपत्तीची हानी; पर्यटन क्षेत्राला धोका! सागरी अभयारण्य क्षेत्रातील विविध अभ्यासात अनेक बाबी उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2023 09:25 IST

जसजशी मालवणच्या सागरी संपत्तीची हानी होत गेली तसतशी मालवणच्या सागरी पर्यटनाचा दर्जाही खालावत चालल्याची वस्तुस्थिती आहे.

संदीप बोडवे

मालवण:

मागील काही वर्षात प्रसिद्ध झालेल्या अभ्यास अहवालांनुसार अभयारण्य क्षेत्रात चालणाऱ्या जलपर्यटना सारख्या अनिर्बंध मानवी हस्तक्षेपामुळे येथील प्रवाळ क्षेत्राचे बरेच नुकसान झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. जसजशी मालवणच्या सागरी संपत्तीची हानी होत गेली तसतशी मालवणच्या सागरी पर्यटनाचा दर्जाही खालावत चालल्याची वस्तुस्थिती आहे. याकडे डोळेझाक झाल्यास पर्यटन व्यवसायाला मोठी किंमत मोजावी लागणार असल्याचे मत तज्ञांकडून व्यक्त होत आहे. 

दरम्यान येथील दुर्मिळ सागरी संपत्तीचे रक्षण आणि संवर्धन करावयाचे असल्यास मालवण सागरी अभयारण्याचा व्यवस्थापन आराखडा कालमर्यादेनुसार राबविणे आवश्यक बनले असून मालवणच्या सागरी अभयारण्य क्षेत्रात करण्यात आलेल्या विविध अभ्यासात पुढील बाबिंसमोर आल्या आहेत. 

निष्कर्ष ▪️अभ्यास प्रकल्पाच्या मान्सूनपूर्व सर्वेक्षणात प्रवाळांच्या १७, एकपेशीय वनस्पतींच्या (अल्गी) १५, खडकातल्या (रीफ) माशांच्या ३५ तर ७ अन्य सागरी प्रजाती नोंदल्या गेल्यात. ▪️ मालवण सागरी अभयारण्याच्या बाहेरील स्थळांपेक्षा तुलनेत अभयारण्याच्या हद्दीतील स्थळांमध्ये माशांचे थवे कमी आढळलेत. ▪️ मालवण मरीन पार्कमध्ये समृद्ध सागरी जैवविविधता आहे. परंतु ती दिवसेंदिवस वेगाने क्षीण होत चालली आहे. ▪️ स्कुबा डायव्हिंग, परिसरात मानवी अधिवास,अति मासेमारी, ही दोन प्रमुख कारणे आहेत. ▪️ स्कुबा डायविंग दरम्यान एकपेशीय वनस्पतींवर अवलंबून असलेल्या माशांना बाहेरील अन्न देण्यात येते. परिणामी एकपेशीय वनस्पतींची वाढ झाली आणि ती विद्यमान कोरल प्रजातींना स्पर्धक ठरत आहे.

▪️ हौशी स्कुबा डायव्हर्स मुळे काही प्रवाळ स्थळे उध्वस्त झाली. यामुळे अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये जिवंत प्रवाळांची टक्केवारी खूपच कमी दिसून आली. या जागा मृत, तुटलेल्या, आणि रोबट कोरलांनी भरलेल्या असून त्या कोरलांच्या स्मशानभूमी सारख्या दिसतात. ▪️ मासेमारी करणाऱ्या ट्रॉलिंग जाळ्यांमुळे प्रवाळांचे तुकडे तुकडे झाले आहेत आणि ते खराब झाले आहेत. ▪️ अनेक साइट्सवर मानव निर्मित कचरा आढळला. किनाऱ्यावरील घनकचऱ्याचाही सागरी परिसंस्थेवर घातक परिणाम होऊ शकतो. ▪️प्रवाळ प्रत्यारोपणात सुधारणा आहे परंतु काहींचे नियमित निरीक्षण करणे आवश्यक. प्रमुख निष्कर्ष ▪️धरण पॉईंट, चिवला बीच आणि क्लासरूम या ठिकाणी कडक प्रवाळ आणि खडका माशांच्या प्रजातींची टक्केवारी सर्वात जास्त आढळली. ▪️ सरगॅसम फॉरेस्टमध्ये शैवालाचे अच्छादन अधिक असल्याने तेथील कोरलांशी त्याची स्पर्धा आहे. ▪️ किंग्ज गार्डन ३, चिवला बीच, किंग्ज गार्डन १, धरण पॉईंट आणि क्लासरूम पॉईंट या भागात प्रवाळ आणि माशांची विविधता सर्वाधिक असल्याने हे भाग हॉटस्पॉट ठरलेत. ▪️किंग्ज गार्डन १,२ आणि ३ या साईट्स अभयारण्याच्या कोअर झोनमध्ये असून त्या ठिकाणी मृत प्रवाळांचे प्रमाण अधिक आहे मात्र ते वैविध्यपूर्ण आहे. ▪️ क्लासरूम पॉईंट हा मालवण पासून दक्षिणेकडे दूर आहे या ठिकाणी उच्च प्रमाणात आहेत 

धोके..▪️ अनियंत्रित पर्यटन उपक्रम ▪️ अभ्यागतां कडून फेकला जाणारा घन कचरा ▪️फोटो व्हिडिओ साठी माशांना कृत्रिम खाद्य पुरविले जाणे परिणामी पाणवनस्पती वाढ ▪️शैवाल, पाणवनस्पती यांची कोरालांशी स्पर्धा ▪️ ट्रॉलिंग मासेमारी.

टॅग्स :Malvan beachमालवण समुद्र किनारा