शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

भरवस्तीतील बंद घरात दरोडा, इन्सुली-कुडवटेंब येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2018 14:51 IST

इन्सुली-कुडवटेंब येथील विकास ज्ञानदेव केरकर यांचे भरवस्तीमधील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मागच्या दाराने प्रवेश करून हा धाडसी दरोडा टाकला.

बांदा : इन्सुली-कुडवटेंब येथील विकास ज्ञानदेव केरकर यांचे भरवस्तीमधील घर फोडून अज्ञात चोरट्यांनी रोख रकमेसह लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. घरात कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी मागच्या दाराने प्रवेश करून हा धाडसी दरोडा टाकला. ५५ हजार रुपयांच्या रोकडसह १ लाख ३५ हजार रुपयांचे दागिने असा मिळून एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा ऐवज लांबविला. बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरटे स्थानिक असण्याची शक्यता बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर यांनी व्यक्त केली. भर दिवसा व भरवस्तीमधील या धाडसी चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बांदा पोलिसांत तक्रार देण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली कुडवटेंब येथे विकास केरकर यांचे महामार्गाला लागूनच भरवस्तीत घर आहे. शनिवारी सकाळी ७.४५ वाजता पत्नी व दोन्ही मुलींसमवेत विकास केरकर हे कारवार येथे नातेवाईकाच्या लग्नाला जाण्यासाठी निघाले. तर त्यांचे वडील सावंतवाडी येथे भावाकडे गेले होते. विकास केरकर हे सायंकाळी ६.१५ च्या सुमारास घरी परतले. घराचे कुलूप काढल्यानंतर मुख्य दरवाजाला आतून कडी घातलेली होती. त्यावरून घरात काहीतरी विपरीत घडल्याचा त्यांना संशय आला. मागच्या बाजूला गेले असता कटावणीच्या सहाय्याने दरवाजा तोडलेला दिसला. आणखी एक दरवाजा फोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला.चोरट्यांनी घरातील तब्बल सात कपाटे फोडली. बेडरूमचा दरवाजा कुलूप तोडून फोडला. बेडरूममधील कपाट फोडून कपाटातील रोख ५० हजार रुपये लांबविले. तसेच २५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार (७५ हजार रुपये), १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन (३६ हजार रुपये) व प्रत्येकी ४ ग्रॅम वजनाच्या दोन अंगठ्या (२४ हजार रुपये) असा एकूण १ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला.चोरीची माहिती विकास केरकर यांनी बांदा पोलिसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक जयदीप कळेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुधीर कदम, मिशाळ, प्रितम कदम यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. चोरटे स्थानिक असण्याची शक्यता निरीक्षक कळेकर यांनी व्यक्त केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग