शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
3
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
4
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
5
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
6
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
7
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
8
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
9
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
10
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
11
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
12
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
13
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
14
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
15
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
16
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
17
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
18
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
19
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
20
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...

सोशल मीडियावर करडी नजर

By admin | Updated: September 20, 2014 00:27 IST

स्वतंत्र समिती ठेवणार लक्ष, मीडियावरील मजकुराचा खर्चात समावेश

रत्नागिरी : सोशल मीडियाच्या माध्यमातून पक्षाचा किंवा उमेदवारांचा प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने यावेळी चांगलाच चाप लावला आहे. त्याचबरोबर विरोधी उमेदवाराबाबतही काही आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर टाकल्यास त्यावरही आयोगाचा बडगा उगारला जाणार आहे. या निवडणुकीत प्रचारासाठी सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडूनही स्वतंत्र पथक नेमण्यात आले असून त्याच्यामार्फत आता या सर्व सोशल साईटवर लक्ष ठेवले जाणार आहे.सध्या सर्वत्रच सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. लोकसभा निवडणुकीतही सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर झाला होता. त्यामुळे प्रचाराला मोठ्या प्रमाणावर मदत झाली होती. या निवडणुकीतही व्हॉटस् अप, फेसबुक, द्वीटर, स्काईप आदी विविध सोशल साईटचा वापर होणार हे गृहीत धरून निवडणूक आयोगाने या निवडणुकीत सोशल साईटचा वापर करणाऱ्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन केले आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार इतर जिल्ह्यांप्रमाणेच जिल्ह्यात सोशल मीडियाचा वापर रोखण्यासाठीही स्वतंत्र पथक कार्यरत झाले आहे. आतापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचाराचा प्रयत्न झाल्यास तो पक्षाच्या खर्चात अंतर्भूत केला जाणार आहे. उमेदवाराने केलेली कामे तसेच काही आक्षेपार्ह मजकूर टाकला जात आहे का, यावरही नियंत्रण ठेवले जात आहे. यासाठी विविध मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क उपयोगात आणले जात असल्याने या कंपन्यांकडूनही जिल्ह्यातील ग्राहकांची यादी घेतली जाणार असल्याने आक्षेपार्ह मजकूर नेमका कोठून टाकण्यात आला आहे, हे निष्पन्न होईल आणि एकदा ही बाब स्पष्ट झाली की असा मजकूर टाकणाऱ्यावर कारवाई केली जाणार आहे.एकंदरीत या निवडणुकीत सोशल मीडियाचा वापर प्रचारासाठी तसेच विरोधकांना नामोहरम करण्याकरिता होऊ शकेल, अशी गाजरे राजकीय मंडळी खुशीत खात होती. मात्र, आता आयोगानेच यावर बडगा उगारल्याने आता आनंदावर विरजण पडले आहे. एकंदरीत आता सोशल मीडियावर प्रचाराबरोबरच आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्यांना, त्यांना ‘लाईक’ वा ‘शेअर’ करणाऱ्यांवरही ही समिती वचक ठेवणार असल्याने आता या निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत या सोशल मीडियाचा वापर साऱ्यांनाच जपून करावा लागणार आहे. त्याप्रमाणे असा आक्षेपार्ह मजकूर कुणाला आढळून आल्यास त्यांनी निवडणुक विभागाकडे याबाबत तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)