शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कमी पटसंख्याअभावी शाळा बंद विरोधात शिक्षण मंत्र्यांच्या घरावर लाँग मार्च 

By अनंत खं.जाधव | Updated: October 26, 2023 13:58 IST

सावंतवाडी : 20 पटसंख्येपेक्षा कमी संख्या असल्याचे कारण पुढे करीत राज्यातील पंधरा हजाराहून अधिक शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या ...

सावंतवाडी : 20 पटसंख्येपेक्षा कमी संख्या असल्याचे कारण पुढे करीत राज्यातील पंधरा हजाराहून अधिक शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणाविरोधात शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या घरावर आजरा ते सावंतवाडी असा लॉंग मार्च निघणार आहे. शनिवार दि.28 पासून निघणाऱ्या या शिक्षण हक्क यात्रेत हजारो लोक सहभागी होणार असल्याची माहिती या आंदोलनाचे प्रमुख कॉ. संपत देसाई यांनी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून दिली आहे.पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारच्या या धोरणामुळे वाडी वस्तीवरील हजारो शाळा बंद होणार आहेत. याचा पहिला फटका मुलींना बसणार आहे. समूह शाळेच्या नावाखाली खाजगीकरणाच्या दिशेने सरकार वाटचाल करीत आहे. शिक्षण हक्क कायदा झाल्यानंतर प्राथमिक शिक्षण सर्वाना मोफत उपलब्ध होईल असे वाटतं होते. पण त्याचं कायद्याचा गैरवापर करीत राज्य सरकार बहुजन समाजातील कष्टकरी जात वर्गातील मुलांच्या शिक्षणाचा गळा घोटू पाहतंय. मुळातच इथे शिकण्याला बंदी होती. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केलेल्या संघर्षातून आता कुठे पहिली पिढी शिकत आहे. त्यांच्या शिक्षणाची वाट कायमची बंद करणारे हे धोरण आहे. याविरोधात हे आंदोलन आम्ही सुरु केले आहे.जोपर्यंत वीस पटाखालील शाळा बंद करण्याचा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुजाण नागरिक, पालक शिक्षक यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही शाळा बचाव आंदोलनाच्या वतीने करीत आहोत. राज्य सरकारच्या या धोरणाचा सर्वाधिक फटका हा शिक्षण मंत्री केसरकर यांच्या मतदार संघातील विद्यार्थ्यांना बसणार आहे. कारण या मतदारसंघातील सर्वाधिक शाळा बंद होणार आहेत. हा लॉंग मार्च आजरा येथून पायी चालत सावंतवाडी पर्यंत येईल. एक हजाराहून अधिक लोक या आंदोलनात सहभागी होणार आहेत

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSchoolशाळाDeepak Kesarkarदीपक केसरकर