शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

तळवडेत लोकप्रतिनिधींमध्ये ‘डबलबारी’

By admin | Updated: December 1, 2015 00:17 IST

गुरूनाथ पेडणेकरांना धक्काबुकी : शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दाखल ; वक्तव्य भोवले

सावंतवाडी : तळवडे येथील डबलबारी सामन्याच्या उद्घाटनासाठी आलेल्या शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश परब यांच्यावर भाषणातून आगपाखड करताच शिवसेना-कॉँग्रेसच्या सदस्यांमध्येच भजनापूर्वीच ‘डबलबारी’ झाली. यावेळी पेडणेकर यांना धक्काबुक्की झाली. या प्रकरणानंतर तळवड परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते. दरम्यान, याप्रकरणी सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी पोलिस स्थानकात बबलू काजरेकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांच्या विरोधात धक्काबुकी करण्यात आल्याची तक्रार दिली आहे.तळवडे येथे तिरंगी डबलबारीचे आयोजन करण्यात आले होते. त्या डबलबारीचे उद्घाटन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती गुरूनाथ पेडणेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी डबलबारी कार्यक्रमावेळी शुभेच्छापर भाषण केले. या भाषणावेळी त्यांनी भाषणाच्या ओघात शेवटच्या काही ओळीत शिवसेनेचे स्थानिक नेते प्रकाश परब यांच्यावर गावात नको ती कर्म करीत असल्याचा आरोप केला. या आरोपानंतर परब यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाले.शिवसेना व काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी हमरातुमरीवर आले दोन्ही गट भिडले. यावेळी धक्काबुक्कीचाही पकार घडला. पण दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते ऐकण्यास तयार नव्हते. अखेर सभापती गुरू पेडणेकर यांनी थोडीशी माघार घेत यावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वीच शिवसेना कार्यकर्त्यांनी सभापती गुरूनाथ पेडणेकर यांना धक्काबुक्कीही केली. यावेळी गोंधळाचा प्रसंग निर्माण झाला होता. अखेर त्यावर पडदा पडला. पण तळवडे येथे डबलबारी सामन्यापूर्वीच डबलबारीचा प्रसंग घडल्याने यांची चर्चा मात्र जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरू होती.या तिरंगी डबलबारी सामन्याच्या कार्यक्रमाला अफाट गर्दी झाली होती. मातोंड, तळवडे, होडावडे, मळगाव, निरवडे, तुळस तसेच पंचक्रोशीतून हजारो भजनरसिक उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर उद्घाटनपर भाषण संपल्यानंतर एकच गोंधळ उडाला, आयोजकांचीही धांदल उडाली. राजकीय वाद करमणुकीच्या कार्यक्रमाला उमटले. पण तळवडे गावाच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला. या प्रकारानंतर तळवडे येथे तणावाचा प्रसंग निर्माण झाला होता. पोलिसांनीही परिस्थितीचा आढावा घेतला असून, रात्री उशिरापर्यंत कोणताही अनुचित प्रकार घडला नव्हता. (प्रतिनिधी)पेडणेकर, जाधव यांची पोलिसात तक्रारतळवडे येथे घडलेल्या प्रकारानंतर सोमवारी सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी शिवसेनेचे बबलू काजरेकर यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांविरोधात धक्काबुकीची तक्रार दिली असून, पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. तर कॉंग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्या निकिता जाधव यांनीही सभापतींना धक्काबुकी केल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते आपल्या घरावर चाल करून आले. तसेच भ्रमणध्वनीवरून शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. पोलिसांनी उशिरापर्यंत कोणावर ही कारवाई केली नव्हती.केसरकरांचा छुपा दहशतवाद दिसून आला : संजू परबकाँग्रेसवर दहशतवादाचे आरोप करणारे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी तळवडेतील प्रकारानंतर कोण दहशतवाद पसरवतो हे बघावे. आमच्या पदाधिकाऱ्यांनी चुकीचे बोलले तर त्यांना अडवून धमकी देणे, हे कितपत योग्य आहे, असा सवाल करीत शिवसेनेचाच हा छुपा दहशतवाद असून सत्तेच्या जोरावर दीपक केसरकर हे पेरत आहेत, असा आरोपही परब यांनी यावेळी केला.मी माफी मागितली नाही : गुरूनाथ पेडणेकरतळवडे येथे घडलेल्या प्रकारानंतर सभापती गुरूनाथ पेडणेकर यांना विचारले असता ते म्हणाले,बोलण्याच्या ओघात मी बोलून गेलो पण मी कुणाची माफी मागितलेली नाही. कोण तरी चुकीची माहीती पसरवत आहे, असे सभापती गुरूनाथ पेडणेकर यांनी सांगितले.