शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी? राणेंनी घेतली फडणवीसांची भेट, शिवसेनेच्या भूमिकेकडेही लक्ष

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: March 28, 2024 21:04 IST

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency: लोकसभेच्या तळकोकणातील सर्वांत शेवटच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरण्यासाठीच्या हालचालींना वेग घेतला आहे.

- महेश सरनाईक सिंधुदुर्ग - लोकसभेच्या तळकोकणातील सर्वांत शेवटच्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना निवडणूक रिंगणात उतरण्यासाठीच्या हालचालींना वेग घेतला आहे. शिवसेनेने या मतदारसंघावर दावा केला आहे. शिवसेनेकडून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचे नावे आघाडीवर असतानाच आता भाजपकडून नारायण राणेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समजली. दरम्यान, नारायण राणे यांनी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील सागर बंगल्यावर भेट घेतल्यामुळे हालचालींनी वेग घेतला असल्याचे बोलले जात आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांतून मिळून बनलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजपकडून नारायण राणे यांचे नाव उमेदवार म्हणून आघाडीवर असून, शिवसेनेकडून किरण सामंत यांनीही आपली दावेदारी कायम ठेवली आहे. तळकोकणात महायुतीच्या उमेदवारीचा तिढा अद्याप सुटला नसला तरीही लोकसभा निवडणुकीत भाजपचे स्टार प्रचारक असलेले नारायण राणे यांनाच उमेदवारी मिळणार, अशा बातम्या गेल्या दोन दिवसांत मीडियात येत आहेत. या पार्श्वभूमीवर स्वत: नारायण राणे यांनी फडणवीस यांची भेट घेतल्याने रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा प्रश्न निकाली लागण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्गबाबत संभ्रमशिवसेनेने लोकसभा निवडणुकीबाबत गुरुवारी सायंकाळी जाहीर केलेल्या आठ जणांच्या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचा समावेश नव्हता. कारण, या ठिकाणचे विद्यमान खासदार विनायक राऊत हे ठाकरेंसमवेत एकनिष्ठ राहिल्याने ही जागा शिवसेनेकडून घेण्यासाठी भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी गेले दोन महिने जोरदार भूमिका घेतली होती. तळकोकणातील भाजपची ताकद वाढली असून, ही जागा भाजपच लढवेल यासाठी प्रयत्न केले. त्यातच शिवसेनेची पारंपरिक जागा असून, यासाठी किरण सामंत यांनी दावेदारी केली होती. त्यामुळे या जागेबाबत संभ्रमही निर्माण झाला होता.

दीपक केसरकरांच्या भूमिकेमुळे दुजोरादोन दिवसांपूर्वी शालेय शिक्षणमंत्री तथा शिवसेनेचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सावंतवाडीत पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणेंना भाजपने राज्यसभेवर पाठविले नव्हते. कारण, त्यांना लोकसभेसाठी उमेदवारी द्यायची असेल, अशी भूमिकाही मांडली होती. त्यामुळे नारायण राणे हेच लोकसभेचे उमेदवार असतील, याबाबतच्या शक्यता वाढल्या होत्या.

 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे ratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४