शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

शालेय पोषण आहार कामगारांचा गुरुवारी आजरा ते सावंतवाडी लॉग मार्च, शिक्षण मंत्र्यांच्या कार्यालयावर धडक देणार

By सुधीर राणे | Updated: November 21, 2023 14:20 IST

कणकवली: राज्यातील शालेय पोषण आहार कामगारांचे कमी  पगार व इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ७० किलोमीटरची आत्मक्लेश पदयात्रा (लॉंग मार्च) ...

कणकवली: राज्यातील शालेय पोषण आहार कामगारांचे कमी  पगार व इतर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी ७० किलोमीटरची आत्मक्लेश पदयात्रा (लॉंग मार्च) २३ नोव्हेंबर रोजी आजरा येथून निघणार आहे. ही पदयात्रा २४ नोव्हेंबर रोजी सावंतवाडी येथे शिक्षणमंत्री  दिपक केसरकर यांच्या कार्यालयावर धडकणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार  फेडरेशनचे अध्यक्ष प्राचार्य कॉ. ए. बी.पाटील व सिटूच्या सचिव मंडळ सदस्य कॉ. विजयाराणी पाटील यांनी संयुक्तपणे दिली आहे.प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सिटू संलग्न महाराष्ट्र शालेय पोषण आहार कामगार फेडरेशनच्या बैठकीत मदतनीस आणि स्वयंपाकी यांच्या पगारामध्ये वाढ करावी, इंधनभार आणि भाजीपाला खर्चात वाढ करावी, आहारामध्ये अंडी वाटपच्या समावेशाबाबत फेरविचार करावा, आदी विषयांवर चर्चा झाली. बैठकीत गेली अनेक वर्षे वरील प्रश्न प्रलंबित असून महाराष्ट्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कामगार संघटनेच्या पुढाकाराने आजरा ते सांवतवाडी लॉग मार्च काढावा असा प्रस्ताव मांडण्यात आला. दुसऱ्या दिवशी सिटू संलग्न महाराष्ट्र शालेय पोषण आहार राज्य फेडरेशनची झूम वरून ऑनलाईन बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ‌‌शालेय पोषण आहार योजना कामगारांना महाराष्ट्रात दरमहा फक्त अडीच हजार रुपये पगार मिळत आहेत. तामिळनाडू राज्यात शालेय पोषण आहार कामगारांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी दर्जा दिला आहे. तर केरळ आणि इतर सर्व राज्यांत किमान सात हजार ते चौदा हजार रुपये पगार आहे. महाराष्ट्रात कामही सक्तीने करून घेतले जाते, पण पगार केवळ अडीच हजार रुपये दिला जातो. मंत्री दिपक केसरकर यांच्या समोर याबाबत असंतोष व्यक्त करण्यासाठी गुरुवारी (दि.२३) आजरा येथून लॉग मार्च निघून शुक्रवारी (दि.२४) सावंतवाडी येथे शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयावर धडकणार आहे. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर