शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला टाळे, उंबर्डेत संतप्त ग्रामस्थांचे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 17:21 IST

उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार थांबवून रिक्त पदे तातडीने भरावीत. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानीची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी उंबर्डे परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या अटकावाला न जुमानता आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.

ठळक मुद्दे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला टाळे, उंबर्डेत संतप्त ग्रामस्थांचे कृत्यअनागोंदी सुरू असल्याचा आक्षेप; अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी

वैभववाडी : उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनागोंदी कारभार थांबवून रिक्त पदे तातडीने भरावीत. तसेच वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानीची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी उंबर्डे परिसरातील संतप्त ग्रामस्थांनी पोलिसांच्या अटकावाला न जुमानता आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले.

यावेळी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत मागण्या मान्य होत नाहीत; तोपर्यंत आंदोलन स्थगित न करण्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. या पार्श्वभूमीवर सायंकाळी उशिरा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिफे उंबर्डेत दाखल झाले होते.प्राथमिक आरोग्य केंद्रात अनागोंदी कारभार तसेच वैद्यकीय अधिकारी व कर्मचाºयांची मनमानी सुरू असल्याची लेखी तक्रार करीत या प्रकाराची चौकशी करून कारवाईची मागणी उंबर्डे सरपंच एस. एम. बोबडे यांनी केली होती. अन्यथा आंदोलन छेडू असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, त्याबाबत जिल्हा आरोग्य विभागाने कोणतीही कारवाई केलेली नाही. किंबहुना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभारातही सुधारणा झालेली नसल्याचा आरोप करीत गुरुवारी सकाळी उंबर्डे पंचक्रोशीतील शेकडो ग्रामस्थ आरोग्य केंद्राच्या परिसरात जमले होते.यात माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष नासीर काझी, जिल्हा परिषद सदस्या शारदा कांबळे, एस. एस. बोबडे, दशरथ दळवी, किशोर दळवी, सदानंद दळवी, उमर रमदुल, रजब रमदुल, उदय मुद्रस, जगदीश मोपेरकर, महंमद पाटणकर, खुदबुद्दीन रमदुल, कादीर नाचरे, यासीन बोबडे, हमीद नाचरे, दस्तगीर मनाजी, रवींद्र पांचाळ, बादशाह रमदुल, रमेश केळकर, अलिबा बोथरे आदींचा समावेश होता.आरोग्य नव्हे तर आंदोलन केंद्रउंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र हे परिसरातील अठरा गावांचे आशास्थान आहे. मात्र, या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे नूतनीकरण प्रशासकीय अनास्थेपायी सहा वर्षे रेंगाळले होते. वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्याकडेही जिल्हा परिषद व आरोग्य विभागाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे वेळोवेळी दिसून येते. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळेच उंबर्डे प्राथमिक आरोग्य केंद्र हे आरोग्य केंद्र न राहता कोणत्या ना कोणत्या कारणास्तव आंदोलन केंद्र बनत चालले आहे. 

टॅग्स :Morchaमोर्चाsindhudurgसिंधुदुर्ग