शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्जमाफीची पूर्तता नाही, शरद पवार गट आक्रमक

By अनंत खं.जाधव | Updated: June 20, 2024 12:36 IST

जिल्हाधिकारी यांना निवेदन 

सावंतवाडी : सिधुदुर्गातील शेतकऱ्यांना सरकारने घोषित केलेल्या कर्ज माफीबाबतची अद्याप पूर्तता केलेली नाही. यात छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतर्गत उर्वरित शेतकऱ्यांना लाभ मिळावा, महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतर्गत दोन लाखांवरील शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच खावटी कर्जमाफी व खावटी कर्जमाफीची मुदत वाढविण्याबाबत व नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर ५० हजार रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे जिल्हाधिकारी यांना देऊन त्यांचे लक्ष वेधण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास ३ जुलैपासून जिल्हास्तरीय आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे. राज्य सरकारने कार्यवाही करून शेतकन्यांना न्याय मिळवून न दिल्यास पावसाळी अधिवेशनात विधान भवनासमोर शेतकयांसह ठाण मांडून बसू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना पारे-परब यांनी दिला आहे.जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना शेतक-यांच्या प्रश्नांबाबत अर्चना घारे परब, जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष श्यामसुंदर राय आदींसह राष्ट्रवादीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्षा अॅड. रेवती राणे, पुंडलिक दळवी,सायली पाटकर,सुनीता भाईप, सुधा सावंत आदी उपस्थित होते.पीकविमा घेऊन तो सलग तीन वर्षे नियमितपणे वर्षाच्या आत परतफेड अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान आदेश दिले होते. पण, काही ठराविक शेतकन्यांना यात हे अनुदान मिळाले असून बाकीच्या शेतकयांनाही ते तात्काळ मिळाले पाहिजे. खावटी  कर्जमाफीबद्दल सरकारने आदेश काढला असून यासाठी ३१ मार्च २०१६ मध्ये ७५६४ शेतकयांनी खावटी कर्ज घेतेले होते. या सर्व शेतकऱ्याचे कर्ज माफ करण्याचा सरकारने आदेश दिला होता. पण, यावर काही निर्णय घेण्यात आला नसून या शेतक-यांच्या  कर्जावरील व्याजाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तत्कालीन सहकारमंत्री अतुल सावे यांनी  शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्ज रक्कम जमा करण्याचा निर्णय घेतला होता. याबद्दल सरकारकडून आदेश काढण्यात आला होता मात्र अजून ती रक्कमही शेतक-यांच्या  कर्ज खात्यात जमा झाली नाही. दोन लाखावरील थकबाकी असणारे शेतकरी मध्यम भूधारक आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात कोणताही निर्णय झाला नसून यात अनेक शेतकरी कर्जमाफी होण्याप्रतीक्षेत आहेत. हे सर्व सरकारने गांभीर्यानि घेऊन लवकरात लवकर मार्गी लावावेत अशी मागणी जिल्हाधिका-यांकडे करण्यात आली. अन्यथा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी