शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गात ७ कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित, शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांक जारी 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 24, 2024 19:16 IST

९ भरारी पथके स्थापन : १८५ केंद्रांवर खरेदी करण्याचे कृषी विभागाचे आवाहन

गिरीश परबसिंधुदुर्ग : कृषी विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ७ कृषी सेवा केंद्राचे परवाने निलंबित केले असून त्यांना बी बियाणे व खते विक्रीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे सद्य:स्थितीत १८५ कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांनी आवश्यक ती खरेदी करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.पाऊस सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांनी भातपेरणीच्या कामाला सुरुवात केली आहे. यासाठी लागणारे बियाणे जिल्ह्यातील १९२ कृषी सेवा केंद्रांमध्ये खरेदी केले होते. राज्य शासनाच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये. यासाठी भरारी पथक स्थापन करून कृषी सेवा केंद्रांना अचानक भेटी देऊन तपासणी करत आहेत. अशाच एका तपासणीत देवगड, कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील ७ कृषी केंद्रे दोषी आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कृषी केंद्रामध्ये दरपत्रक न लावणे, साठा फलक न लावणे असा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. शासनाने शेतकऱ्यांसाठी टोल फ्री क्रमांकसुद्धा जारी केले आहेत.

शेतकऱ्यांसाठी टोल फ्री नंबर८८३०२९०८८७, ८८२२४४६६५५

९ भरारी पथके स्थापन..शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही यासाठी कृषी विभागाने ९ भरारी पथकांची स्थापना केली आहे. प्रत्येक तालुक्यात एक व जिल्ह्याच्या ठिकाणी एक अशी ९ पथके तैनात आहेत. एका पथकात ५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहेत. हे पथक ‘ऑन दि स्पॉट’ कोणत्याही कृषी केंद्रात जाऊन तेथील वस्तुस्थितीची तपासणी करू शकतात.

शेतकऱ्यांनी बी, खते खरेदी करतेवेळी पक्क्या पावत्या घाव्यात. काही शंका असल्यास कृषी विभागाकडे तक्रार करावी.. - अरुण नातू , कोरड वाहू क्षेत्र विकास अधिकारी

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्र