शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

सिंधुदुर्ग जिल्हा भाजपामय करूया ! एकजूटीने जनहीताची कामे करा :नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:19 IST

संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा भाजपामय करण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी भाजपा पदाधिकार व कार्यकर्त्यांना केले .

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्हा भाजपामय करूया ! एकजूटीने जनहीताची कामे करा :नारायण राणेसिंधू आत्मनिर्भर अभियानांतर्गत कणकवली येथे बैठक

कणकवली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ६ वर्षात देशाच्या व देशवासीयांच्या प्रगतीसाठी यशस्वीपणे उत्तम काम केले आहे . त्यामुळे त्यांचे जागतिक नेता म्हणून जगभरात कौतुक होत आहे . पंतप्रधानांचे हे कार्य तसेच भाजपा पक्षाचे जनहीताचे आणि विकासाचे कार्यक्रम गावागावातील जनतेपर्यंत पोहचवा. तसेच संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा भाजपामय करण्यासाठी प्रयत्न करा. असे आवाहन माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी भाजपा पदाधिकार व कार्यकर्त्यांना केले .भाजपाच्या सिंधू आत्मनिर्भर अभियानांतर्गत कणकवली येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकत्यांच्या बैठकीत खासदार नारायण राणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी आमदार नितेश राणे , भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली , माजी आमदार प्रमोद जठार , अजित गोगटें , अतुल काळसेकर , जिल्हापरिष अध्यक्षा समिधा नाईक आदी मान्यवर उपस्थित होते .नारायण राणे म्हणाले, सिंधुदुर्गात भाजपा हा संघटनात्मक दृष्ट्या एक नंबरचा पक्ष आहे . ग्रामपंचायतींपासून सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्थांवर कार्यकत्यांनी एकजीव होऊन एकजूटीने जनहीताची कामे करून हा जिल्हा भाजपामय करू या. पक्षाने जनहीताचा तसेच आत्मनिर्भर बनण्याचा जो कार्यक्रम दिला आहे , तो जनतेपर्यंत गावागावात जाऊन पोहचवा .सर्वांनी एकजूटीने कार्य केल्यास सत्ताधारी विरोधकांना आपण पुरून उरू , प्रत्येकजण स्वतःच्या निवडणूकीत जसे विजयी होण्यासाठी काम करता , तसेच नियोजनबद्ध काम पक्षाचा जनहीताचा कार्यक्रम राबविताना करा .पंतप्रधान मोदी यांचे काम मोठे आहे . ते कार्य जनतेपर्यंत पोहचवा . विरोधकांवर कडवटपणे टीका करा . जिल्ह्यात ठिकठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकारच्या निष्क्रीयतेविरोधात आंदोलने व्हायला हवीत . असे आवाहनही त्यांनी केले . नारायण राणे पुढे म्हणाले , सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी मंजूर झालेले १४४ कोटी रूपयांमध्ये कपात करण्यात आली असून त्यातील १४ कोटी रूपयांचा निधीच आलेला आहे . त्यापैकी २५ टक्के निधी कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी खर्च करावयाचा आहे .विकासासाठी १० कोटी रूपयेसुद्धा राहाणार नाहीत. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कामाने कर्तुत्वाने आणि जनसेवेची कामे करून लोकप्रियता मिळवावी . गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी भाजपाचे कार्यकर्ते चांगले काम करतात असे वातावरण निर्माण व्हायला हवे . त्यासाठी ग्रामस्थ व नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करा .सहाकारी कार्यकत्यांशी प्रेमाने वागून त्यांच्याकडून काम करून घ्या . यापुढील होणाऱ्या सर्व सार्वजनिक निवडणूकीत आपण विजय मिळवू . त्यादृष्टीने तयारीला लागा . सिंधुदुर्ग जिल्हा भाजपामय व्हायला हवा . पंतप्रधानांचे कार्य तसेच भाजपाचे कार्यक्रम व विचार गावागावातील लोकांमध्ये गेले तर ते अशक्य नाही .पक्षाला नावलौकीक मिळवून देणारे काम करा , या जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ता निष्ठेने व प्रामाणिकपणे त्याच्या कामातून पाठबळ मिळत आहे . तुमचे चांगले काम पाहून पक्षश्रेष्ठी कौतुक करतील असे काम करा . या जिल्ह्यातील पक्षाचे कार्यक्रम शिस्तबद्ध व नियोजनबद्ध व्हायला हवेत.सिंधुदुर्गात कोरोनाचे रूग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत . या कोरोनाच्या संक्रमन नष्ट करून कोरोनाला आळा घालण्यासाठी सरकारी यंत्रणांना मदत करा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले . प्रारंभी अतुल काळसेकर यांनी प्रास्ताविक केले . यावेळी आमदार नितेश राणे, राजन तेली , डॉ . मिलींद कुलकर्णी, डॉ . प्रसाद देवधर , प्रभाकर सावंत यांनीही मार्गदर्शन केले . माजी आमदार प्रमोद जठार यांनी आभार मानले .

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपाNarayan Raneनारायण राणे