शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

जगाला हेवा वाटेल असे कोकण निर्माण करू या: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 08:48 IST

मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफिल्ड प्रकल्पामुळे अंतर निम्म्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क, कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) : समृद्धी महामार्गाप्रमाणेच मुंबई-सिंधुदुर्ग कोस्टल वे या ग्रीनफिल्ड महामार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्राला लाभलेल्या ७२० किलोमीटरच्या समुद्रकिनारपट्टीवरून हा महामार्ग जाणार आहे. त्यामुळे प्रवासाला सध्या लागत असलेला कालावधी निम्म्यावर येईल. या महामार्गातून विकासाला मोठी चालना मिळेल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.  

कोकण सुजलाम् सुफलाम् करायचा आहे. त्यासाठी कोकण विकास प्राधिकरणाची निर्मिती केली आहे. काजूवर प्रक्रिया करण्यासाठी ११०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. भूविकास बँकेचे ९५०० कोटी रुपये माफ केल्याने त्याचा फायदा कोकणवासीयांनादेखील झाला आहे. याशिवाय विकासाच्या दृष्टीने राहिलेला बॅकलाॅग भरून काढून जगाला हेवा वाटेल असा कोकण निर्माण करू या, असे आवाहनही शिंदे यांनी केले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ हायस्कूलच्या पटांगणावर ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले,  आपण लोकांच्या हितासाठी काम करतोय. सर्वांसाठी काम करतोय म्हणून आपल्याकडे आलोय. सरकार आपल्या दारी आले आहे. केंद्र व राज्य दोन्ही सरकारे हातात हात घालून काम करीत आहेत. नारायण राणेंकडे असणाऱ्या उद्योग मंत्रालयाचा वापर करून स्वयंरोजगार प्रकल्प आणून लाखो लोकांना रोजगार देणारे हात या ठिकाणी निर्माण करू या.

राणे-केसरकर दिलजमाई

-  २०१४ च्या निवडणुकीपासून नारायण राणे आणि दीपक केसरकर यांच्यात मोठी राजकीय दरी निर्माण झाली होती. 

-  दोघेही एकमेकांवर तुटून पडायचे. परंतु, आता शिंदे-फडणवीस सरकारमध्ये केसरकर शिंदे सेनेमध्ये मंत्री झाल्यानंतर त्यांना भाजपचे नेते केंद्रीय मंत्री राणे यांच्याशी जुळवून घ्यावेच लागले. 

-  त्यामुळे सावंतवाडीतील कार्यक्रम असो किंवा कुडाळमधील कार्यक्रम, केसरकर व राणे एकाच व्यासपीठावर होते. त्यामुळे या दोन नेत्यांतील दिलजमाई झाल्याचे दिसले.

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेkudal-acकुडाळsindhudurgसिंधुदुर्ग