शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
3
काळजाचा थरकाप! पती-पत्नीने जंगलात प्रवास थांबविला; ५ वर्षांचा चिमुरडा रात्रभर मृतदेहांपाशी बसून राखण करत होता
4
नव्या वर्षात लोकलप्रवास होणार अधिक वेगवान; ७४९ नव्या लोकल फेऱ्या; १३३ मेल-एक्सप्रेस धावणार
5
Stock Market Today: शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex मध्ये १०० अंकांची तेजी; Hindustan Copper सुस्साट
6
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
7
थंडीत बाईक चालवताय, मग अँटी-फॉग वाइझर हेल्मेट वापरुन पाहा ना; काय आहे खास, जाणून घ्या
8
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
9
मंगेश काळोखे हत्या; चोवीस तासांत नऊ जेरबंद; सर्व आरोपींना ४ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
10
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
11
Gold Silver Price: खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
12
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
13
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
14
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
15
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
16
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
17
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
18
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
19
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
20
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: तळकटमध्ये बिबट्याचा लोकवस्तीत प्रवेश, सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 13:42 IST

वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी

दोडामार्ग : कोल्हापूरमध्ये पोलिस कर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, दोडामार्ग तालुक्यातील तळकट गावात मंगळवारी (दि.११) रात्री बिबट्याने थेट लोकवस्तीमध्ये प्रवेश करत, दाजी नांगरे यांच्या घराच्या अंगणात हजेरी लावली. या घटनेचा थरारक प्रसंग घराजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाला आहे.या अनपेक्षित घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे सावट पसरले असून, ग्रामस्थांमध्ये तीव्र दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्या काही काळ अंगणात उभा असल्याचे दिसून आले आणि त्यानंतर तो परिसरातून निघून गेला. मात्र, लोकवस्तीमध्ये वन्य प्राण्याचा हा मुक्त संचार ग्रामस्थांसाठी नव्या संकटाचे संकेत ठरत आहे.ग्रामस्थांनी सांगितले की, मागील काही दिवसांपासून गावाच्या परिसरात रात्रीच्या वेळी जनावरांचे ओरडणे आणि पावलांचे आवाज ऐकू येत होते. मात्र, मंगळवारी रात्रीचा हा प्रसंग प्रत्यक्ष कॅमेऱ्यात कैद झाल्याने भीती अधिक वाढली आहे. दररोज सकाळी मुले शाळेसाठी बाहेर पडतात, तर येथे फळबागायती मोठ्या प्रमाणात असल्याने शेतकऱ्यांना पहाटेपासून शेतीकामासाठी बाहेर जावे लागते. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर सुरू राहिला, तर कोणतीही अनर्थाची शक्यता नाकारता येणार नाही.

वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणीवनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे, तसेच रात्रीच्या वेळी बाहेर न जाणे, घरांच्या अंगणात प्रकाश ठेवणे आणि पाळीव जनावरे सुरक्षित स्थळी बांधून ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Leopard Enters Residential Area in Sindhudurg, Captured on CCTV

Web Summary : A leopard entered a residential area in Talkat, Sindhudurg, causing panic. The incident was captured on CCTV, raising concerns among villagers. Residents urge forest department action.