शहरं
Join us  
Trending Stories
1
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
2
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
3
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
4
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
5
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
6
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
7
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
8
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
9
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
10
बाइक टॅक्सीचालकाचा तरुणीवर अतिप्रसंग; धैर्याने प्रतिकार करीत गाठले पोलिस ठाणे
11
संपादकीय : महायुतीचा नवा बूस्टर..! नागपूर अधिवेशनात चर्चा, मुनगंटीवारांची सभागृहात तुफान टोलेबाजी
12
नवी मुंबई विमानतळामुळे मुंबईत सकाळच्या वेळी येता येईल का? संध्याकाळी परत जाता येईल का?
13
नवी मुंबई विमानतळावर तिसरीही धावपट्टी! दीर्घकालीन हवाई वाहतुकीचा आढावा; सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू
14
गोवा अग्निकांड; अपघात नव्हे, अक्षम्य बेपर्वाई! २५ जणांच्या मृत्यूनंतर मालकांचे थायलंडमध्ये पलायन
15
कढीपत्ता फोडणीतच; बायका, मुलं, भाऊ मैदानात..! कार्यकर्त्यांची सतरंज्या उचलण्याची भूमिका कधी संपणार?
16
विमा क्षेत्रात १०० टक्के एफडीआय- सर्वांसाठीच बाधक! कोट्यवधी विमाधारकांची गुंतवणूक धोक्यात
17
IND vs SA 3rd T20I : टीम इंडियानं मॅच जिंकत दक्षिण आफ्रिकेला टाकले मागे; पण सूर्या-गिल पुन्हा फेल!
18
अपहरणाचा कट नगर पोलिसांनी उधळला! पुण्याच्या दिशेने जाताना नागापूर पुलावर थरार, दोघांना अटक
19
"मोदी, शाह, राजनाथ, नड्डा...!" भाजपचे कार्यकारी अध्यक्ष होताच काय म्हणाले नितीन नवीन?
20
‘लोकमत महागेम्स’मुळे पुन्हा मैदानावर दिसली क्रीडासंस्कृती: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदार एकवटले : कोकणातल्या डीएड्, बीएड्धारकांनी नागपुरात केले धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 15:54 IST

आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे या मागणीसाठी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील डीएड्, बीएड्धारकांनी नागपूर येथील विधिमंडळासमोर धरणे आंदोलन छेडले. या प्रश्नावर कोकणातील आमदार एकवटले आहेत.

ठळक मुद्देकोकणातल्या डीएड्, बीएड्धारकांनी नागपुरात केले धरणे आंदोलनआमदार एकवटले : शिक्षक भरतीत स्थानिकांनाच प्राधान्य द्या

सिंधुदुर्गनगरी : कोकणातील तरुणांवर शिक्षक भरतीत होणारा अन्याय आता खपवून घेणार नाही. परजिल्ह्यातील उमेदवारांना रुजू होऊ देणार नाही, असा इशारा देत आगामी शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळालेच पाहिजे या मागणीसाठी रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, पालघर या जिल्ह्यांतील डीएड्, बीएड्धारकांनी नागपूर येथील विधिमंडळासमोर धरणे आंदोलन छेडले. या प्रश्नावर कोकणातील आमदार एकवटले आहेत.कोकण डीएड्, बीएड्धारक असोसिएशनच्या नेतृत्वाखाली कोकणातील पाच जिल्ह्यांतील डीएड्, बीएड्धारक नागपूर येथे मंगळवारी एकवटले होते. स्थानिकांना न्याय मिळालाच पाहिजे, विदर्भ-मराठवाड्याचे पुनर्वसन कोकणात नको, जिल्हा बदल्यांची कोकणातील समस्या थांबलीच पाहिजे, न्याय द्या आम्हांला न्याय द्या, शाळा आमची, पोरे आमची शिक्षक बाह्यलो कित्याक अशा घोषणा देत नागपूर येथील यशवंत मैदान दणाणून सोडले.या आंदोलनाचे नेतृत्व संदीप गराटे, उपाध्यक्षा भाग्यश्री रेवडेकर, सचिव संदेश रावणंग, लखू खरवत, कृपाली शिंदे, सुरेश ताटे, दत्ता शिरंगे यांनी केले.धोरणात्मक बदल करून आगामी शिक्षक भरतीत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्थानिकांना ७० टक्के आरक्षण मिळावे. ७० टक्के स्थानिक व ३० टक्के इतर(राज्य) हा प्रवेश प्रक्रियेचा निकष राबविण्यात यावा, जिल्हा बदल्यांमुळे कोकणातील विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी व येथील बेरोजगारी कमी करण्यासाठी स्थानिक डीएड् व बीएड्धारकांना शिक्षक भरतीत प्राधान्य मिळावे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे डोंगराळ व रायगड, ठाणे, पालघर जिल्ह्यांतील काही भाग आदिवासी क्षेत्रातील असून भरतीत संबंधित निकषातून आरक्षण मिळावे. सन २०१० सारखे विदर्भ-मराठवाड्यातील शिक्षकांचे पुनर्वसन कोकणात नको. स्थानिकांचा ७० टक्केचा कोटा रिकामा राहिल्यास त्या ठिकाणी टीईटी अपात्र उमेदवारांना नोकरीची संधी देण्यात यावी, या मागण्या निवेदनातून केल्या.कोकणातल्या जिल्ह्यांमध्ये हा लढा गेली १० वर्षे सुरू आहे. ही बाब विचारात घेऊन कोकणातील सर्वच आमदार या प्रश्नासाठी एकवटल्याचे यावेळी दिसून आले. आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. कोकणातील हा प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी बुधवारी अधिवेशनात आवाज उठविणार असल्याचे आमदार राजन साळवी आणि आमदार सदानंद चव्हाण यांनी सांगितले.ठरावांची दखल घेण्याची मागणीशिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य मिळण्याबाबतचा ठराव रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्हा परिषदांमध्ये घेण्यात आला आहे. विविध पंचायत समित्या, ग्रामपंचायती, शाळा व्यवस्थापन कमिट्या यांनीही स्थानिकांना प्राधान्य मिळण्यासाठी ठराव केले आहेत.लोकप्रतिनिधी, विद्यार्थ्यांचे पालक, ग्रामस्थ यांनीही स्थानिक शिक्षक आमच्या शाळांमध्ये द्या, अशी मागणी यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. कोकणातील आमदार, खासदार यांनीही या आंदोलनाला पाठिंबा असल्याची पत्रे दिली आहेत. स्थानिकांच्या या आंदोलनाची दखल राज्याच्या विधिमंडळात घेण्यात यावी, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीsindhudurgसिंधुदुर्गNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८