शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

राजकोट येथील घटनेचे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राजकारण थांबवावे - नितेश राणे 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: August 27, 2024 19:18 IST

कणकवली : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना अतिशय वेदनादायी होती. शिवरायांच्या पुतळ्याची ती अवस्था कोणच ...

कणकवली : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना अतिशय वेदनादायी होती. शिवरायांच्या पुतळ्याची ती अवस्था कोणच पाहू शकत नाही. दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी भूमिका सरकारने घेतली आहे. राजकोट किल्ल्यावर पुन्हा सरकार दिमाखात पुतळा उभारणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले.आमदार सतेज पाटील यांनी विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्यासाठी भूमिका घ्यावी. पुतळ्याच्या घटनेप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घाणेरडे राजकारण थांबवावे असेही राणे म्हणाले. कणकवली येथील ओम गणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.नितेश राणे म्हणाले,  पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी त्या घटनेच विश्लेषण केल आहे. आणि पुढे काय होणार याचीही माहिती दिलेली आहे. आज सकाळी नौदलाची टीम पाहणी करुन गेली आहे. ही घटना राजकीय नाही. काँग्रेस, उबाठा या ठिकाणी येतात हे चुकीचे आहे. सतेज पाटील आले होते, विशाळगडवर असलेल्या अतिक्रमणाबद्दल त्यांनी घेतलेली भूमिका शिवप्रेमींशी ही साजेशी आहे का ?  एवढा त्यांना जर शिवरायांबद्दल आदर असता तर गडकिल्यांवर अतिक्रमण हटविण्याची भूमिका घेतली असती अशी टीका नितेश राणे यांनी यावेळी केली. ठेकेदार व संबंधिताना अटक झाली पाहिजेशिवप्रेमींनी आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पहिले आम्ही शिवप्रेमी आहोत, नंतर पक्षाचे कार्यकर्ते आहेत. शिवभक्त म्हणून आमची तीव्र भावना आहे, ठेकेदार व संबंधिताना अटक झाली पाहिजे. कठोर कारवाई झाली पाहिजे. आम्ही कोणाची गय करणार नाही असा इशारा आमदार नितेश राणे यांनी यावेळी दिला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजNitesh Raneनीतेश राणे