शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पणदूरमध्ये अवैध गोवा बनावटीच्या दारूवर एलसीबीची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 13:52 IST

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी पहाटे ५ .३० वा. पणदूर येथे अवैद्य दारू वाहतूकीवर केलेल्या कारवाई १ लाख ४२  हजार  ८० रुपयांच्या

ठळक मुद्दे१ लाख ४२ हजार ८० रुपयांची दारू जप्त : चालकाला अटक

 सिंधुदुर्गनगरी :   स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुंबई गोवा महामार्गावर बुधवारी पहाटे ५ .३० वा. पणदूर येथे अवैद्य दारू वाहतूकीवर केलेल्या कारवाई १ लाख ४२  हजार  ८० रुपयांच्या गोवा बनावटीच्या दारूसह ७ लाख ४२ हजार ८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच अवैध दारू वाहतूक केल्याप्रकरणी वाहन चालक आंतोन लॉरेन्स रॉड्रिक्स  रा. सातार्डा, सावंतवाडी याला ताब्यात घेण्यात आले आहे.       

जिल्हा पोलीस अधिक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्या सुचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्यावतीने गोवा बनावटीची अवैध दारू वाहतूक रोखण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक कुडाळ पणदूर अशी पेट्रोलिंग करत असताना  बुधावरी (१० एप्रिल) पहाटे ५.३० वाजता मारुती स्विफ्ट कार (एमएच ०७ एजी ४६८९) सुसाट वेगाने कणकवलीच्या दिशेने जाताना या पथकाला दिसली. ही गाडी तपासणीसाठी चालकाला थांबण्याचा ईशारा करण्यात आला.

मात्र चालकाने गाडी न थाबविल्यामुळे या गाडीचा एलसीबीच्या पथकाने पाठलाग करत गाडी थांबवून तपासणी केली असता वाहनामध्ये सुमारे १ लाख ४२ हजार ८० रूपये किमतीची गोवा बनावटीची दारु अवैध आढळून आली. त्यामुळे ही दारू व ६ लाखाची कार असा मिळून एकूण ७ लाख ४२ हजार ८० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.      तसेच अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक केल्या प्रकरणी आंतोन लॉरेन्स रॉड्रिक्स यांना अटक करून त्यांच्या विरोधात महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ अ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रल्हाद पाटील, सहाय्यक पोलीस फौजदार संजय आंबेरकर, सुभाष खांदारे, पोलीस हेड कॉन्स्टेबल गुरुनाथ कोयंडे, जॅक्सन गोन्साल्विस, अमित तेली, ज्ञानेश्वर कांदळगावकर यांच्या भरारी पथकाने हि कारवाई केली आहे.

टॅग्स :konkanकोकणCrime Newsगुन्हेगारी