शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्व. विलासराव देशमुखांसारखी तुमची वाटचाल हवी : मंत्री नारायण राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 15:36 IST

ज्या पक्षाने आपल्याला पदे दिली त्यापक्षाची जाणीव ठेवली पाहिजे. लोकांचे आशीर्वाद मिळवून काम करा. मी साहेब नाही , जनतेचा सेवक आहे. त्यामुळे कधीही हाक द्या . मी जनसेवेसाठी हजर असेन असेही राणे म्हणाले.

कणकवली:  पदाधिकाऱ्यांनी  विकास कामांबाबत अभ्यास करायला हवा. त्यासाठी वेळ मिळेल तेव्हा विविध विषयांवरील वाचन केले पाहिजे. पंचायत समिती कार्यालयात चांगले वाचनालय हवे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सभापती ते मुख्यमंत्री अशी वाटचाल केली. तशी तुमची वाटचाल असावी असा सल्ला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.  कणकवली पंचायत समिती नूतन इमारत लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.ज्या पक्षाने आपल्याला पदे दिली त्यापक्षाची जाणीव ठेवली पाहिजे. भाजपची सत्ता असलेली ही पंचायत समिती आहे. त्यामुळे लोकांचे आशीर्वाद मिळवून काम करा. मी साहेब नाही , जनतेचा सेवक आहे. त्यामुळे कधीही हाक द्या . मी जनसेवेसाठी हजर असेन असेही राणे म्हणाले.कणकवली पंचायत समितीच्या नूतन इमारतीच्या आतील कारभार सुबक झालं पाहिजे. तेव्हाच इमारत सुंदर दिसेल. नागरिकांचे प्रश्न मार्गी लागावेत, त्यासाठी ही इमारत आहे. यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण केले. त्यामुळेच पदाधिकाऱ्यांनीही त्या पद्धतीने काम करावे. कणकवलीत कुठलेही मतभेद नाहीत. ही चांगली बाब असून या नूतन इमारतीतून लोकाभिमुख कामे करा असा सल्ला  मंत्री राणे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला.यावेळी माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे ,जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, पंचायत समिती सभापती मनोज रावराणे, अंकुश जाधव, संजय देसाई,श्रीया सावंत, भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली, भाग्यलक्ष्मी साटम, उपसभापती प्रकाश पारकर, मिलींद मेस्त्री, तुळशीदास रावराणे आदींसह पंचायत समिती सदस्य व तालुक्यातील सरपंच, उपसरंपच, पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीNarayan Raneनारायण राणे