शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

दूध प्रक्रिया प्रकल्प मोजतोय शेवटच्या घटका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:11 IST

Milk Supply, shindhudurg, कणकवली तालुक्यातील वागदे - गोपुरी आश्रमाजवळील शासकीय दूध डेअरी आता शेवटच्या घटका मोजत आहे.

ठळक मुद्देदूध प्रक्रिया प्रकल्प मोजतोय शेवटच्या घटका !शासनाची अनास्था ;वागदे येथील शासकीय डेअरी

सुधीर राणे कणकवली : कणकवली तालुक्यातील वागदे - गोपुरी आश्रमाजवळील शासकीय दूध डेअरी आता शेवटच्या घटका मोजत आहे. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या या दूध प्रक्रिया प्रकल्पाकडे लोकप्रतिनिधिंबरोबरच शासनाचे अक्षम्य असे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या शासकीय डेअरीचे कामकाज गेल्या ५ वर्षांपासून पूर्णपणे ठप्प झाले असून तेथील कोट्यवधींची मशिनरी गंजली आहे.२६ डिसेंबर १९६६ रोजी वागदे येथे शासकीय दूध डेअरीची स्थापना करण्यात आली. संपूर्ण सिंधुदुर्गातून या डेअरीत दूध संकलन केले जात असे. ज्यावेळी शिवसेना - भाजप युतीचे शासन पहिल्यावेळी राज्यात आले. त्यावेळी सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले नारायण राणे दुग्धविकास मंत्री झाले. त्यांच्या कार्य काळात सुमारे ४ कोटी रुपये खर्च करून वागदे येथे शासकीय दूध डेअरीची अद्ययावत इमारत उभारण्यात आली.तसेच केंद्र शासनाच्या एकात्मिक दूग्ध विकास योजनेंतर्गत शेतकर्‍यांना दूधाळ जनावरे अनुदान तत्वावर वाटप करण्यात आली होती. नवीन डेअरीमध्ये अद्ययावत दूध पॅकिंग मशीन, दूध निर्जंतुकीकरण, दूध एकजिवीकरण, दूध शीतकरण, ५ टनाचा बर्फ कारखाना, प्रत्येकी ५ हजार लिटरच्या दूध संकलनासाठी ४ टाक्या, दहा मोठ्या गाड्या, दोन जीप, १० हजार व्हॅटचा जनरेटर अशा अनेक सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या. तर दूग्धशाळा व्यवस्थापक, १२ पर्यवेक्षक, ३३ मजूर, पहारेकरी व कार्यालयीन कर्मचाऱ्यांसह एकूण ७४ कर्मचारी येथे कार्यरत होते. ' आरे ' ब्रॅण्डच्या नावाखाली ग्राहकांना या डेअरीतून दर्जेदार दूध मिळत असे. तर दरदिवशी अडीच ते तीन हजार लीटर आरे ब्रॅण्डचे दूध पॅकिंग होत असे.२०१५ पासून कामकाज पूर्णपणे ठप्प !सन २०१३ पर्यंत या डेअरीत १० ते १२ हजार लीटर दूध संकलन होत होते. गावागावात ११० दुग्धविकास संस्था मार्फत गाड्या पाठवून दूधाचे संकलन केले जात असे. तसेच मिरज, चिपळूण आदी शासकीय डेअरीतून दूध आणले जात असे. जुलै २०१३ पासून या डेअरीचे कामकाज हळूहळू ठप्प होऊन दूध संकलन बंद करण्यात आले. त्यानंतर २ वर्षे गोकुळ दूध संघाने त्यांच्याकडील दूध थंड करण्यासाठी या डेअरीचा वापर केला. मात्र , त्यानंतर त्यांनी स्वतःचे कोल्ड स्टोरेज उभारल्यानंतर तेही बंद झाले . तर सन २०१५ पासून या डेअरीचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे.मंत्र्यांचे आश्‍वासन हवेतच विरले !२०१७ मध्ये तत्कालीन दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी या शासकीय डेअरीला भेट दिली होती. त्यावेळी या डेअरीच्या नुतनीकरणाचा ४० लाखाचा प्रस्ताव त्यांच्याकडे देण्यात आला होता. २० कर्मचार्‍यांची नियुक्‍ती आणि डेअरीचे नुतनीकरण केल्यास ही डेअरी पुन्हा एकदा कार्यान्वित करणे शक्य आहे.असेही त्यांच्या निदर्शनास आणण्यात आले होते. मात्र, त्यांनी त्यावेळी डेअरी पुनरूज्जीवनाचे दिलेले आश्‍वासन हवेतच विरले आहे.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाsindhudurgसिंधुदुर्ग