लांजा : भारत व्यापार वृद्धी संस्था, नवी दिल्ली यांच्यामार्फत भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा २०१४, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता. तेथे प्रत्येक राज्याचे स्वतंत्र दालन तयार करण्यात आले होते. त्या - त्या राज्यातील व्यापार - व्यवसायाचे आकर्षक प्रदर्शन भरवण्यात आले. या ठिकाणी लांजा काजू प्रक्रिया उद्योगानेही आपला स्टॉल उभारला होता.महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने महाराष्ट्राच्या दालनात जवळपास ९७ उद्योजकांना संधी प्राप्त करुन दिली. यात कोकणातून चार उद्योजक सहभागी झाले होते. त्यामध्ये लांजा काजू उद्योग समूह, मँगो प्रोसेसिंग क्लस्टर पावस, कृपा हेअर आॅईल, गुहागर यांचा समावेश आहे. यामध्ये विशेषत: महिला उद्योजकांना प्राधान्याने संधी देण्यात आली. महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने महिला उद्योजकांनी या व्यापार मेळा प्रदर्शनात सहभाग घेऊन आपले स्टॉल्स अत्यंत लक्षवेधी पद्धतीने सजवले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या व्यापारी मेळाव्यातील महाराष्ट्राच्या दालनाचे उद्घाटन केले. त्यांच्यासोबत उद्योगमंत्री प्रकाश मेहता, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय, खासदार रामदास आठवले, महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष फारुकी, कार्यकारी संचालक दौंड इत्यादी मान्यवर होते.मुख्यमंत्री व सर्व उपस्थितांनी लांजा काजू प्रक्रिया उद्योग समूहाच्या स्टॉलला प्रत्यक्ष भेट देऊन समाधान व्यक्त केले. लांजा काजू प्रक्रिया उद्योग समूहाचे अध्यक्ष जयवंत विचारे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी लांजा काजू समुहाचे गुरुप्रसाद पवार व राकेश बने उपस्थित होते. (प्रतिनिधी)दिल्ली येथे भरविलेल्या प्रदर्शनात गवाणे (ता. लांजा) येथील काजू प्रक्रिया उद्योगातर्फे जयवंत विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.
लांजा काजू उद्योग समूह दिल्लीत
By admin | Updated: November 28, 2014 00:08 IST