शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
4
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
5
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
6
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
7
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
8
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
9
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
10
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
11
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
12
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
13
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
14
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
15
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
16
Narendra Modi: दहशतवादाविरोधात दुतोंडी भूमिका नको; पंतप्रधान मोदींचे एससीओमध्ये पाकिस्तानला खडेबोल 
17
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
18
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?
19
Maratha Kranti Morcha: चार दिवसांत आंदोलकांची १० हजार वाहने मुंबईत!
20
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...

पर्यटकांना खुणावतोय रानपाटचा रम्य धबधबा

By admin | Updated: November 17, 2014 23:26 IST

रत्नागिरी तालुका : कोकण रेल्वेतून होते विलोभनीय दर्शन

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील रानपाट येथील धबधबा पर्यटकांचे आकर्षण ठरला आहे. १२ महिने वाहणाऱ्या धबधब्याकडे पाहून मन उल्हासित होऊन धबधब्याखाली मनसोक्त आंघोळ करण्याचा मोह आवरला जात नाही. मात्र, या नयनमनोहर धबधब्याकडे दुर्लक्ष होत आहे.रत्नागिरीतील लाजूळ व रानपाट या दोन बोगद्यांमध्ये असणारा हा निसर्गरम्य, आकर्षक धबधबा आपल्याला जाता-येता रेल्वेने पाहता येऊ शकतो. हे ठिकाण पाहण्यासाठी लाजूळ येथे गाडी पार्क करुन पायी १ ते १.५ किलोमीटरचा प्रवास करावा लागतो.कोकणात पावसाळ्यात आपल्याला अनेक ठिकाणी धबधबे पाहायला मिळतात. पावसाळ्यात या धबधब्याखाली जाता येत नाही. कारण पाण्याचा प्रवाह जोराचा असतो. परंतु श्रावणानंतर या पाण्याचा प्रवाह कमी होतो. त्यानंतर धबधब्याखाली आंघोळ करता येऊ शकते. या धबधब्याचे वैशिष्ट्य असे की, येथे आंघोळीसाठी कोणताही धोका नाही.धबधब्याचे पाणी थेट अंगावर घेता येते. या धबधब्याशेजारी एक छोटा डोह आहे. यामध्ये या धबधब्याचे पाणी साचून पुढे वाहू लागते. या ठिकाणी पाण्याची उंची साधारण ३ ते ४ फूट उंच आहे. त्यामुळे या धबधब्याखाली आंघोळ करण्यासाठी लहान मुले घेऊन गेल्यास कोणताही धोका नाही. धबधब्याशेजारी सपाट दगड असून, या ठिकाणी बसून जेवणासह अल्पोपाहार करण्यासाठी मोठी जागा आहे. धबधब्याच्या ठिकाणी गेल्यावर पुन्हा पुन्हा जावेसे वाटेल, असा आहे. या निसर्गरम्य धबधब्याची माहिती नसल्याने हा धबधबा अजूनही दुर्लक्षित आहे. मात्र, कोकण रेल्वेने जाणाऱ्या - येणाऱ्या प्रवाशांना हा रानपाटचा धबधबा सुखावत आहे. (वार्ताहर)रत्नागिरी तालुक्यातील रानपाट येथील हा धबधबा पर्यटकांना खुणावत आहे.बाराही महिने वाहतो रानपाटचा धबधबा.धोकादायक नसल्याने पर्यटक मनसोक्त लुटू शकतात धबधब्याखाली आंघोळीचा आनंद.पर्यटकांची अजूनही पाठ.