शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आचरा वीज वितरणच्या उपकेंद्राला जमीन देणाऱ्यालाच निमंत्रण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 18:42 IST

 आचरा येथील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वीज वितरणच्या उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला. घाईगडबडीत उरकण्यात आलेल्या या सोहळ्यास आचरा सरपंच चंदन पांगे व जमीन देणारे जमीन मालक निलेश सरजोशी यांना निमंत्रित न केल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देआचरा वीज उपकेंद्र अपूर्णावस्थेत असतानाही घाईगडबडीत आटोपले उद्घाटन घाईगडबडीत उरकण्यात आला लोकार्पण सोहळा १५ दिवसांत पूर्णत्वाने उपकेंद्र चालू होणार

आचरा ,दि. ०७ :  आचरा येथील गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या वीज वितरणच्या उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा खासदार विनायक राऊत व आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते पार पडला. घाईगडबडीत उरकण्यात आलेल्या या लोकार्पण सोहळ्यास आचरा गावचे सरपंच चंदन पांगे व अल्प दराने जमीन देणारे जमीन मालक निलेश सरजोशी यांना निमंत्रित न केल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अपूर्णावस्थेतील उपकेंद्राचे घाईगडबडीत उद्घाटन करण्यामागे हेतू काय असा प्रश्न आचरा सरपंच चंदन पांगे यांनी केला.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आचरा उपकेंद्राचा लोकार्पण सोहळा कोणताही गाजावाजा न करता खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते पार प. यावेळी शिवसेनेचे मोजकेच कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार वैभव नाईक, मालवण तालुकाप्रमुख बबन शिंदे, प्रसाद मोरजकर, उदय दुखंडे, जगदीश पांगे, चिंदर सरपंच माया सावंत, उपसरपंच अनिल गावकर, वीज वितरणचे कार्यकारी अभियंता संजय गवळी, आचरा उपअभियंता वीरेंद्र सिंग, सहाय्यक अभियंता दीपक मुघडे, प्रकल्प अधिकारी सचिन शंकर, कृष्णा सावंत आदी उपस्थित होते.

१५ दिवसांत पूर्णत्वाने उपकेंद्र चालू होणारलोकार्पण सोहळ्यानंतर उपकेंद्रामधून वीज पुरवठा चालू झाला आहे का? अशी चौकशी केली असता कार्यकारी अभियंता संजय गवळी व आचरा वीज वितरणचे उपअभियंता सिंग यांनी माहिती दिली की, आचरा परिसरातील २३ गावांचा वीजपुरवठा करण्यासाठी वायंगणी, मुणगे व आडवली असे ११ केव्हीचे तीन फिडर उभारुन ३३ केव्हीच्या वीज वाहिनीला गार्डींग केले जाणार आहे. उपकेंद्र चार्ज केले असून काही किरकोळ कामे पूर्ण करून येत्या पंधरा दिवसांत ते चालू केले जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.काम अर्धवट असताना शिवसेनेला उद्घाटनाची कसली घाई : चंदन पांगेआचरा गावातील वीज प्रश्न सुटावा ही मागणी ग्रामस्थांमधून होत होती. आचरा उपकेंद्राचे काम पूर्णपणे ठप्प झाले होते. ते चालू व्हावे म्हणून वीज वितरणच्या कार्यालयात फेºया मारल्या. वीज वितरण दखल घेत नसल्याने प्रसंगी उपोषणासही बसलो. त्याची दखल घेतल्याने उपकेंद्राच्या कामास गती मिळाली.

आज आचरे गावाचा सरपंच या नात्याने आपणास कोणतेही निमंत्रण दिले गेले नाही. उपकेंद्राचे काम अर्धवट असताना लोकांना अंधारात ठेऊन घाईगडबडीत उद्घाटनाचा घाट शिवसेनेने कशासाठी घातला? असा प्रश्न करीत ग्रामस्वच्छता सप्ताह चालू असताना उपकेंद्राकडे राहणाऱ्या  कर्मचाऱ्याना साधे शौचालय नाही. याची लोकार्पण करणाऱ्या खासदारांना माहिती नाही का? असा संतप्त प्रश्न आचरा सरपंच चंदन पांगे यांनी केला.

निलेश सरजोशींची नाराजीआचरा गावात वीज उपकेंद्र व्हावे व विजेचा प्रश्न मार्गी लागावा म्हणून आपली लाखो रुपयांची २ एकर जमीन २०१० साली कवडीमोल दराने वीज वितरणला दिली. त्यावेळी वीज वितरणच्या अधिकाऱ्यानी या उपकेंद्राच्या इमारतीवर आपल्या दिवंगत वडिलांच्या नावाची पाटी लावली जाईल तसेच उपकेंद्राचे उद्घाटन करताना आपल्याला सन्मानित करण्यात येईल असे लेखी पत्राद्वारे सांगितले होते. मात्र आज नावाची पाटी व सन्मान सोडाच पण साधे आमंत्रण दिले गेले नसल्याचे सांगत मूळ जमीनमालक निलेश सरजोशी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गmahavitaranमहावितरण