शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरण कामाच्या दुसऱ्या टप्प्यात भूसंपादनाची थ्रीडी अधिसूचना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 16:30 IST

चौपदरीकरण कामाच्या दुसऱ्या टप्प्यात संपादित करायच्या जमिनीसाठीची थ्रीडी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या दोन थ्रीडी असून एकामध्ये कणकवली, ओसरगाव व वागदे तर दुसऱ्यामध्ये असलदे, हुंबरट, जांभळगाव, जानवली, खारेपाटण, नडगिवे, नागसावंतवाडी, नांदगाव, साळीस्ते, संभाजीनगर, तळेरे, उत्तर - दक्षिण गावठाण, वारगाव या गावांचा समावेश आहे.

ठळक मुद्देभूसंपादनाची अधिसूचना जाहीरचौपदरीकरण कामाच्या दुसऱ्या टप्प्यात थ्रीडी अधिसूचना

कणकवली : चौपदरीकरण कामाच्या दुसऱ्या टप्प्यात संपादित करायच्या जमिनीसाठीची थ्रीडी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. या दोन थ्रीडी असून एकामध्ये कणकवली, ओसरगाव व वागदे तर दुसऱ्यामध्ये असलदे, हुंबरट, जांभळगाव, जानवली, खारेपाटण, नडगिवे, नागसावंतवाडी, नांदगाव, साळीस्ते, संभाजीनगर, तळेरे, उत्तर - दक्षिण गावठाण, वारगाव या गावांचा समावेश आहे.दरम्यान, थ्रीडीनंतर संयुक्त मोजणी व मूल्यांकन करून निवाडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती भूसंपादन अधिकारी तथा प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.

पहिल्या टप्प्यातील भूसंपादन प्रक्रिया झाल्यानंतर काही ठिकाणच्या जमिनींची संपादन प्रक्रिया शिल्लक राहिल्याचे दिसून आले होते. यासाठी नव्याने संपादन प्रक्रिया करण्याच्या अनुषंगाने निवाडे तयार करण्यात आले होते.या जमिनींसाठी थ्रीए जाहीर झाल्यानंतर आता थ्रीडी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे.

या अधिसूचनेत कणकवलीसह ओसरगाव व वागदे या गावांचा समावेश आहे. त्यात टोलनाक्यासह शिल्लक जमिनींचा समावेश करण्यात आला आहे. या तीन गावांमधील मिळून १५९१५ हेक्टर एवढ्या जमिनीचा समावेश आहे.

दुसऱ्या थ्रीडीमध्ये असलदे, हुंबरट, जांभळगाव, जानवली, खारेपाटण, नडगिवे, नागसावंतवाडी, नांदगाव, साळीस्ते, संभाजीनगर, तळेरे , उत्तर-दक्षिण गावठाण, वारगाव या तेरा गावांमधील २.१६५ हेक्टर जमिनीचा समावेश आहे.शिल्लक जमिनीच्या संपादनासाठीची थ्रीडी जाहीर झाल्यानंतर संयुक्त मोजणी होऊन मूल्यांकन होणार आहे. त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी पाठविण्यात येणार आहे.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग