शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

आंगणेवाडीत लाखो भाविक नतमस्तक, भराडीच्या चरणी भक्तांची मांदियाळी,  मोडयात्रेने होणार यात्रोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 16:51 IST

आई भराडी देवीच्या चरणी लाखो भाविक लीन होत अवघी आंगणेवाडीनगरी (ता. मालवण) भक्तिमय वातावरणाने न्हाऊन गेली. शनिवारी पहाटे २.३० वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. सायंकाळपासून भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी फुलून गेली होती. देवी भराडीच्या अगाध शक्तीच्या अभूतपूर्व संगमाचा याची देही याची डोळा प्रत्यय भाविकांना आला.

ठळक मुद्देआंगणेवाडीत लाखो भाविक नतमस्तक भराडीच्या चरणी भक्तांची मांदियाळीमोडयात्रेने होणार यात्रोत्सवाची सांगताव्हीआयपी भाविकांनी घेतले देवीचे दर्शनसुलभ नियोजन : प्रशासन यशस्वी

आंगणेवाडी (ता. मालवण) : आई भराडी देवीच्या चरणी लाखो भाविक लीन होत अवघी आंगणेवाडीनगरी भक्तिमय वातावरणाने न्हाऊन गेली. शनिवारी पहाटे २.३० वाजल्यापासून दर्शनास सुरुवात झाली. सायंकाळपासून भाविकांच्या गर्दीने आंगणेवाडी फुलून गेली होती. देवी भराडीच्या अगाध शक्तीच्या अभूतपूर्व संगमाचा याची देही याची डोळा प्रत्यय भाविकांना आला.मालवण तालुक्यातील आंगणेवाडीच्या श्री देवी भराडी यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या नियोजनबद्ध आखणीमुळे यात्रा सुरळीत पार पडली. यात पोलीस प्रशासन, ग्रामस्थ मंडळ तसेच सर्व प्रशासकीय यंत्रणांच्या चोख नियोजनामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात येत होते. यात्रेत अनुचित प्रकार अथवा अपघात घडू नये यासाठीही विशेष लक्ष ठेवण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे राजकीय नेते तसेच सिनेकलाकार यांचीही उपस्थिती मोठ्या संख्येने लाभली.

आंगणेवाडी येथील भराडीदेवीच्या यात्रेतील भाविकांनी केलेली गर्दी यात्रेचे विशाल रूप अधोरेखित करीत होती. (छाया : गणेश गावकर)

आंगणेवाडी मंडळ आणि जिल्हा प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी स्वतंत्र दहा रांगांची व्यवस्था करण्यात आली होती. शेकडो पोलीस बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरेही यात्रोत्सवावर लक्ष ठेवून होते. रात्री भाविकांच्या गर्दीने व आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिर परिसर झळाळून गेला होता. रविवारी मोडयात्रेने आंगणेवाडी यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.

 

व्हीआयपींची मांदियाळीआंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवात पहिल्या दिवशी १0 लाख भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. यात राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, पालकमंत्री दीपक केसरकर, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, आमदार सुनील प्रभू, आमदार तथा मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे यांच्यासह शिवसेनेचे सिंधुुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी, आमदार किरण पावसकर, माजी आमदार विजय सावंत, माजी आमदार शिवराम दळवी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, अतुल काळसेकर, संदेश पारकर, अतुल रावराणे, स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत, अशोक सावंत, मंदार केणी यांच्यासह शिवसेना, स्वाभिमानी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकारी, अनेक राजकीय नेते, अभिनेते अरूण कदम भराडी देवीचरणी लीन झाले.

आंगणेवाडी येथील भराडीदेवीच्या यात्रेतील भाविकांनी केलेली गर्दी यात्रेचे विशाल रूप अधोरेखित करीत होती. (छाया : गणेश गावकर)

सुलभ नियोजन, प्रशासन यशस्वीराज्यभरातून येणाऱ्या भाविकांसाठी दहा रांगा तसेच मुख दर्शनाची सुविधा मंडळाकडून देण्यात आली होती. यासह व्हीआयपी तसेच अपंग व ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र रांग ठेवण्यात आली होती. एसटी प्रशासनाकडून विशेष २५० गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.

दोन दिवस चालणाऱ्या जत्रेत शेकडो पोलीस कर्मचारी, ३५ पोलीस अधिकारी अशी पोलीस यंत्रणा बंदोबस्तासाठी तैनात झाली आहे. तसेच यावर्षी रेडिओ सुरक्षा प्रणालीचा वापर, आपत्ती व्यवस्थापनाच्यावतीने आरोग्य विभाग, महसूल, ग्रामपंचायत, पंचायत समिती याबरोबरच आंगणेवाडी मंडळाच्यावतीने भाविकांना सुलभ दर्शनासाठी सुविधा पुरविल्या होत्या.

मालवणी खाजाची आवक वाढलीआंगणेवाडी यात्रेत विविध प्रकारची दुकाने सजली होती. सर्वाधिक मागणी मालवणी खाजाला होती. तसेच मिठाई दुकाने, हॉटेल, कपडे, अन्य प्रकारच्या सर्व गृहोपयोगी वस्तू, खेळणी यांनी सजलेल्या दुकानात मोठी गर्दी होती. शेकडो व्यापाऱ्यांची कोट्यवधीची उलाढाल झाली.राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनआंगणेवाडी यात्रोत्सवात राज्य शासनाच्यावतीने राज्यातील दुसरे भव्य कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. स्थानिक शेतकऱ्यांना शेती व्यवसाय करण्यासाठी चालना मिळावी या उद्देशाने हे प्रदर्शन साकारले आहे. याचे उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले आहे. व्यापारी बांधव, महिलांचे बचतगट तसेच कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल सहज शक्य होणार आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTempleमंदिर