शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
2
लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा
3
महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली, दुग्धाभिषेक केला; फलटणमध्ये रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
4
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
5
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
7
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
8
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
9
रेल्वे प्रवासामध्ये शुगर नाही वाढणार, आता डायबेटिक फूड मिळणार, कोणत्या ट्रेनमध्ये असणार सुविधा
10
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
11
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
12
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
13
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
14
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
15
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
16
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
17
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
18
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
19
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
20
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

कणकवली तालुक्यात पावसामुळे लाखोंचे नुकसान

By admin | Updated: September 26, 2016 23:19 IST

फोंडा परिसराला मोठा फटका : पावसाने उसंत घेतल्याने शेतकऱ्यांना दिलासा

कणकवली : कणकवली शहरासह सिंधुदुर्गात शनिवारी मुसळधार पाऊस पडला होता. मात्र, रविवारी पावसाने काहीसी उसंत घेतली. त्यामुळे चिंताग्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शनिवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने अनेक घरात तसेच दुकानात पाणी घुसल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र नेमकी आकडेवारी सोमवारीच समजू शकणार आहे.कणकवली तालुक्यातील शिवगंगा नदीला पूर आल्याने फोंडा, लोरे नं.१, वाघेरी, कासार्डे आदी गावातील ११० घरे तसेच दुकाने पुराच्या पाण्याने बाधित झाली आहेत. तर सुमारे १०० ग्रामस्थांना शनिवारी रात्री खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरित करण्यात आले होते.गेले दोन दिवस सिंधुदुर्गात जोरदार पाऊस झाला. शनिवारी दिवसभर क्षणाचीही विश्रांती न घेता जोरदार पाऊस पडत होता. त्यामुळे नद्या, ओहोळ, नाले दुथडी भरून वाहत होते. अनेक ठिकाणी घरात पाणीही शिरले होते. त्यामुळे अन्नधान्याचे नुकसान झाले आहे.भातशेतीलाही मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. मात्र तालुक्यातील पुराच्या पाण्याने बाधित झालेल्या सर्वच गावातील नुकसानीचा नेमका आकडा समजू शकलेला नाही. रविवारी शासकीय कार्यालयाना सुट्टी असल्याने शेती तसेच इतर नुकसानी बाबत निश्चित अशी माहिती सोमवारीच समजू शकणार आहे.पावसामुळे भरणी येथील मनोहर तांबे यांच्या घराच्या छपराचे ३००० रुपयांचे नुकसान झाले आहे. तर भिरवंडे येथील रोहिणी धरणे यांच्या घराची भिंत कोसळून १३००० रुपयांचे नुकसान झाले आहे.पुराच्या पाण्याने फोंडा येथील ५५ घरे तसेच दुकाने, लोरे नं.१ येथील ३५ घरे यामध्ये नरामवाडीतील २७ तर गुरववाडीतील ८ घरांचा समावेश आहे. वाघेरी कुळयेवाडी येथील २ घरे, कासार्डे येथील १८ घरे बाधित झाली आहेत. तर लोरे नं.१ मधील मुकुंद गुरव, शशिकांत गुरव, चंद्रकांत गुरव यांना सुमन गुरव यांच्या घरी स्थलांतरित करण्यात आले होते. वाघेरीतील ८ तर कासार्डेेतील ४५ ग्रामस्थानाही स्थलांतरित करण्यात आले होते. पंचायत समिती सदस्य संजय देसाई यांनी आपल्या घरात काही ग्रामस्थाना ठेवले होते. वाघेरी येथे २ लाखांचे, फोंडा येथील मधुसूदन बांदिवडेकर यांचे खताचे १ लाख ७७ हजार, घोणसरी येथील पांडुरंग शिंदे यांचे ६ हजार रुपयांचे खताचे नुकसान झाले आहे. मंडळ अधिकारी दिलीप पाटील, लोरे तलाठी एस. एन. जंगले, हरकुळ तलाठी एस. व्ही. परुळेकर, करुळ तलाठी आर. व्ही. मसुरकर, शिरवल तलाठी एस. आर. बावलेकर या महसुलच्या पथकाने पाहणी करून पंचयादी घातली. या नुकसानीमध्ये आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)वैभववाडीत सर्वाधिक पावसाची नोंदसिंधुदुर्ग जिल्ह्यात तालुकानिहाय रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंतचा पाऊस पुढील प्रमाणे आहे. दोडामार्ग - ३६.०० मिमी (३३२२ मिमी), सावंतवाडी - ६५.०० मिमी (३८५३ मिमी), वेंगुर्ला - ३३.८० मिमी (३०९०.४४ मिमी), कुडाळ - ६६.०० मिमी (३३४४ मिमी), मालवण - ४७.०० मिमी (३३९६ मिमी), कणकवली - ७६.०० मिमी (३८४५ मिमी), देवगड - ६०.०० मिमी (३०२७.७० मिमी ) तर वैभववाडीत १६७.०० मिमी (३९०० मिमी) पाऊस झाला आहे. रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासात सर्वाधिक पाऊस वैभववाडीत झाला आहे. फोंडयात मोरी खचली !पावसामुळे फोंडा कुर्ली रस्त्यावरील बावीचे भाटले येथील मोरी खचली आहे.रेल्वे उशिरानेमुसळधार पावसाचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. कोकण रेल्वे मार्गावरुन गोव्याच्या दिशेने जाणारी कोकण कन्या एक्स्प्रेस रविवारी ६ तास ४५ मिनिटे उशिराने धावत होती. तर मडगाव वरुन मुंबईकडे जाणारी कोकण कन्या एक्स्प्रेस २ तास उशिराने सुटली होती. या गाड्यांबरोबरच अन्य काही गाड्यांही काहीशा विलंबाने धावत होत्या.