शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विजापुरातील निवडणुकीसाठी मजूर रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 18:39 IST

Karnatak Election sindhudurg -कर्नाटक राज्यातील विजापूर परिसरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मजुरीनिमित्त आलेल्या मजूरवर्गाचे तांडेच्या तांडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विजापूर परिसरात रवाना होत आहेत. त्यामुळे एसटीच्या विजापूरला जाणाऱ्या गाड्या हाऊसफुल होत आहेत.

ठळक मुद्दे विजापुरातील निवडणुकीसाठी मजूर रवाना एसटीच्या गाड्या हाऊसफुल : निवडणुकीबाबत कल्पनाच नाही

कणकवली : कर्नाटक राज्यातील विजापूर परिसरात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वारे जोरात आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात मजुरीनिमित्त आलेल्या मजूरवर्गाचे तांडेच्या तांडे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विजापूर परिसरात रवाना होत आहेत. त्यामुळे एसटीच्या विजापूरला जाणाऱ्या गाड्या हाऊसफुल होत आहेत.या बसमध्ये उभे रहायला जागा नसली तर ही मंडळी नंतर येणाऱ्या कोल्हापूरपर्यंतच्या गाड्यांमधून मार्गस्थ होत आहेत. कुडाळ-विजापूर गाडीमध्ये प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. यातील मजूर आम्ही मतदानासाठी गावी जात असल्याचे सांगत आहेत. मात्र, निवडणूक कोणती आहे याची त्यांना माहिती नाही. यासंदर्भात एसटीच्या वाहतूक नियंत्रकांकडे विचारणा केली. त्यावेळी त्यांनीही गेले चार दिवस थेट विजापूरला जाणाऱ्या गाड्या मजुरांनी भरून जात आहेत. तसेच या फेऱ्या मर्यादित असल्याने अनेकजण प्रथम कोल्हापूरला जाऊन तिथून विजापूरला रवाना होत आहेत.विशेष म्हणजे मतदानासाठी जाणाऱ्यांना आपल्या गावा-गावांत कोणत्या निवडणुका आहेत, याची गंधवार्ता नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दर दिवशी ५०० ते १००० रुपये कमवणारे हे मजूर कोणत्या आमिषापोटी चार-सहा दिवसांची मजुरी बुडवून गावी जात आहेत, हे न उलगडणारे कोडे आहे. या मजुरांपैकी अनेक जणांची निवडणूक ओळखपत्रे आणि रास्त दराच्या धान्य दुकानात दारिद्र्य रेषेखालील रेशनकार्डे कर्नाटकासह महाराष्ट्रातही आहेत. ही मंडळी गावाकडील ज्वारी, बाजरी, तांदूळ आदी धान्य खातात. रेशनवर मिळणारी धान्ये काळ्या बाजारात विकतात.या विजापूरच्या मंडळींपैकी बहुतांश जणांची कर्नाटकसह महाराष्ट्रातही रेशनकार्डासह निवडणूक ओळखपत्रे आहेत. त्यांची शासकीय यंत्रणेने चौकशी करावी, अशी मागणी कोकण विकास आघाडीचे मुख्य संघटक गणपत तथा भाई चव्हाण यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

टॅग्स :ElectionनिवडणूकKarnatakकर्नाटकsindhudurgसिंधुदुर्ग