शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळच्या नागरिकांनी धरले मुख्याधिकाऱ्यांना धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:19 IST

कुडाळ शहरातील अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढून टाकण्याची मोहीम सुरू असताना नगरपंचायतीच्या एका अधिकाऱ्यांने नागरिकांशी हुज्जत घातल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना धारेवर धरले. यावेळी मुख्याधिकारी व नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रात्री घडलेल्या या प्रकारानंतर शहरातील गांधी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती.

ठळक मुद्देकुडाळच्या नागरिकांनी धरले मुख्याधिकाऱ्यांना धारेवरअनधिकृत बॅनर काढून टाकण्याची मोहीम रात्री

कुडाळ : शहरातील अनधिकृतपणे लावण्यात आलेले बॅनर काढून टाकण्याची मोहीम सुरू असताना नगरपंचायतीच्या एका अधिकाऱ्यांने नागरिकांशी हुज्जत घातल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांना धारेवर धरले. यावेळी मुख्याधिकारी व नागरिकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. रात्री घडलेल्या या प्रकारानंतर शहरातील गांधी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती.कुडाळ शहरात ठिकठिकाणी लावण्यात आलेले अनधिकृत बॅनर काढून टाकण्याची मोहीम मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्या आदेशानुसार रात्री उशिरा नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी सुरू केली. मात्र याबाबत कोणतीही पूर्वसूचना न दिल्याने काही नागरिक व व्यापाऱ्यांनी गांधी चौक येथे जमत नाराजी व्यक्त केली.

यादरम्यान गांधी चौक येथील कॅरम स्पर्धेचा बॅनर काढण्यासाठी नगर पंचायतीचे कर्मचारी व अधिकारी गेले. यावेळी हा बॅनर काढू नका, उद्या बॅनरची परवानगी घेऊ, असे या कर्मचाऱ्यांना तेथील काहींनी सांगितले. मात्र यावेळी अधिकाऱ्यांने नागरिकांशी हुज्जत घातल्याने शाब्दिक बाचाबाची झाली.या प्रकारामुळे नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी तिथे आलेले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे व कुडाळातील नागरिकांची शाब्दिक बाचाबाची झाली. प्रशासनाने कारवाई करावी, मात्र कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कायद्याची भीती दाखवून जनतेला उद्धट उत्तरे देऊ नयेत, असे म्हणणे नागरिकांनी मांडले. तसेच बॅनरबरोबरच इतर सर्व अनधिकृत गोष्टींवर कारवाई करा, अशी मागणी केली.

यावर ढेकळे यांनी तुम्हाला जे काही सांगायचे आहे ते रितसर कार्यालयात येऊन सांगा. बॅनर हटाव मोहीम नियमाप्रमाणे सुरू असून ती पूर्ण करणारच, असे नागरिकांना सांगितले. तसेच यापुढे शहरात अनधिकृतपणे कोणत्याही प्रकारचे बॅनर लावता येणार नाहीत. बॅनर लावायचे असतील तर नगरपंचायतीची परवानगी घ्यावी, असे जाहीर केले. दरम्यान, बॅनर आठवड्याची मोहीम पहाटेपर्यंत सुरू होती.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग