शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे गाड्यांचा आता वेग वाढणार, प्रवाशांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 17:42 IST

कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. पावसाळी हंगामासाठी असलेले वेळापत्रक बदलल्याने आता गाड्यांचा वेग वाढणार असून प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.

ठळक मुद्दे१ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रकवेळापत्रकाप्रमाणे प्रवास करण्याचे आवाहन

कणकवली : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून बदलणार आहे. पावसाळी हंगामासाठी असलेले वेळापत्रक बदलल्याने आता गाड्यांचा वेग वाढणार असून प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे.निसर्गसौंदर्याने नटलेल्या कोकणच्या भूमीला भेट देणारे पर्यटक आणि त्याचबरोबर आपल्या मूळ गावी येणारे मुंबईकर कोकण रेल्वेला अधिक पसंती देत असतात. मुंबईतून कोकण, गोवा आणि दक्षिणेकडच्या राज्यांकडे जाण्यासाठी कोकण रेल्वे हा सुलभ मार्ग आहे. या मार्गावरून २६ जानेवारी १९९८ ला कोकण रेल्वे प्रथम धावली. त्यावेळेस केवळ ६६ स्थानके होती. आता नव्या २१ स्थानकांची भर पडल्याने ही संख्या ७८ वर पोहोचणार आहे.रोहा ते वेरणा आणि वेरणा ते ठोकूरपर्यंतचे विद्युतीकरणाचे काम टप्प्याटप्प्याने होत आहे. नव्या स्थानकामध्ये इंदापूर, गोरेगाव रोड, सापेवामने, कलंबानी, कडवई, वेरावल्ली, खारेपाटण, आचिर्णे या स्थानकांचा समावेश आहे. स्थानकांची संख्या वाढल्याने रेल्वे गाड्यांचा विलंब आता टाळता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकेल.पावसाळी वेळापत्रक बदलून आता १ नोव्हेंबरपासून नवीन वेळापत्रक लागू होणार आहे. त्या वेळापत्रकानुसार गोवा तसेच सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांतील स्थानकांवरून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल होणार आहे. मात्र, मुंबईहून परतीच्या प्रवासाला निघणाऱ्या या गाड्यांच्या वेळेत बदल होणार नाही.नवीन वेळापत्रकाप्रमाणे मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांच्या कणकवली स्थानकातील वेळा पुढीलप्रमाणे आहेत. मंगला एक्स्प्रेस पहाटे ५.४२ वाजता, दिवा पॅसेंजर सकाळी ९.२१ वाजता, मांडवी एक्स्प्रेस दुपारी ११.३३ वाजता, जनशताब्दी एक्स्प्रेस सायंकाळी ४.२८ वाजता, तुतारी एक्स्प्रेस सायंकाळी ७.४४ वाजता, कोकणकन्या एक्स्प्रेस रात्री ९.०८, मेंगलोर एक्स्प्रेस रात्री ८.४० वाजता, डबलडेकर (मंगळवार, गुरुवार) सकाळी ८.१० वाजता , ओखा एक्स्प्रेस (गुरुवार, शनिवार) दुपारी १.३८ वाजता, पुणे एक्स्प्रेस (मंगळवार, शुक्रवार) सायंकाळी ७.१० वाजता, वातानुकूलित करमळी एक्स्प्रेस (गुरुवारी) दुपारी ३.२० वाजता, तिरूनवेली दादर एक्स्प्रेस (गुरुवार) सकाळी ६.२८ वाजता, बिकानेर एक्स्प्रेस (रविवार) सकाळी ६.२९ वाजता, डबलडेकर (दर रविवारी) दुपारी ३ वाजता मुंबईकडे मार्गस्थ होईल.कोकणकन्या ही सावंतवाडी स्थानकात मुंबईकडे जाण्यासाठी सायंकाळी ७.३६ वाजता, कुडाळ येथे रात्री ८.९ वाजता, सिंधुदुर्गनगरी ८.२८ वाजता तर वैभववाडी येथे ९.३८ वाजता पोहोचेल. तुतारी एक्स्प्रेस ही सावंतवाडी येथून सायंकाळी ६.५० वाजता सुटून कुडाळला ७.१० वाजता, सिंधुदुर्गनगरी येथे ७.३० वाजता पोहोचेल.

मांडवी एक्स्प्रेस ही सावंतवाडीला १०.४० वाजता, कुडाळला ११.०२ वाजता पोहोचेल. ह्यनेत्रावतीह्ण एक्स्प्रेस ही कुडाळला सकाळी ६.५० वाजता तर ह्यतेजसह्ण एक्स्प्रेस कुडाळला ३.२८ वाजता येणार आहे. पावसाळी हंगामात सुरक्षिततेचा उपाय म्हणून गाड्यांचा वेग कमी करण्याबरोबरच गाड्यांच्या वेळेत बदल केला जातो. त्यामुळे गाड्यांना काहीसा विलंब होतो. आता पावसाळा संपत आल्याने वेळापत्रक बदलण्यात आले आहे.१० जूनपर्यंत लागू राहणार वेळापत्रककोकण रेल्वे मार्गावरील नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबर ते १० जून या कालावधीसाठी लागू राहणार आहे. त्यामुळे प्रवाशांनी याची नोंद घेऊन नवीन वेळापत्रकाप्रमाणे प्रवास करावा, असे आवाहन रेल्वेच्या सूत्रांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेsindhudurgसिंधुदुर्ग