शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कुणबी नोंदी तपासणीसाठी समितीची कोकणस्तरीय बैठक

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: December 11, 2023 18:56 IST

मोडीलिपीतील भाषा जाणकारांची मदत घ्या

सिंधुदुर्ग : मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जातप्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहीत करण्यासाठी नियुक्त समितीची बैठक समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी सिंधुदुर्गनगरी येथे पार पडली. यावेळी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्याचा एकत्र आढावा घेण्यात आला.सिंधुदुर्गातील पत्रकार भवनात पार पडलेल्या या आढावा बैठकीत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, सिंधुदुर्ग मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, रत्नागिरी मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती कुमार पुजार, सिंधुदुर्ग पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, रत्नागिरी पोलिस अधिक्षक धनंजय कुलकर्णी, समितीचे उपसचिव विजय पवार, यांच्यासह दोन्ही जिल्ह्यांतील जिल्हा जातप्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष,अपर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी आदी उपस्थित होते.बैठकीच्या सुरुवातीला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी किशोर तावडे, रत्नागिरी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी संपूर्ण विभागाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. त्यामध्ये जिल्ह्यात तपासण्यात आलेली कागदपत्रे व कुणबी, कुणबी-मराठा, मराठा कुणबीच्या आढळून आलेल्या नोंदीबाबतची माहिती दिली. तपासलेल्या अभिलेख प्रकारामध्ये मुख्यतः जन्म-मृत्यूच्या नोंदी व शैक्षणिक अभिलेख्यांमध्ये कुणबी, कुणबी -मराठा, मराठा-कुणबी नोंदी आढळून आल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

मोडीलिपीतील भाषा जाणकारांची मदत घ्यासमितीचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांनी भूमि अभिलेख विभाग, जिल्हा निबंधक व मुद्रांक नोंदणी विभाग, शिक्षण विभाग, पोलीस, कारागृह विभाग यासह विविध विभागांकडील नोंदीबाबतही सविस्तर माहिती जाणून घेतली. संबंधित विभागांनी तसेच मोडी लिपीतील नोंदीबाबत संबंधित भाषा जाणकारांची मदत घेण्यात यावी, असेही निर्देश त्यांनी दिले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaratha Reservationमराठा आरक्षणCaste certificateजात प्रमाणपत्र