शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

कोकणकन्या लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी

By admin | Updated: June 7, 2014 00:44 IST

सुमित्रा महाजन

सुभाष कदम ल्ल चिपळूणचिपळुणात केवळ तिचा जन्म नव्हे तर अख्खं बालपण गेलं. आजही तिच्या बोलण्यात या मातीचा गंध येतं राहतो, त्याच चिपळूणच्या माहेरवाशिण असलेल्या सुमित्रा महाजन यांना लोकसभेच्या सर्वोच्च स्थानी विराजमान होण्याचा मान मिळालाय. चिपळूणच्या या सुकन्येने एवढंच केलं नाही, तर या लोकसभा निवडणुकीत विजय संपादन करून सलग आठवेळा निवडून येण्याचा विक्रमही रचलाय.चिपळूण तालुक्यातील शिरळसारख्या डोंगराळ, दुर्गम भागात १२ एप्रिल १९४३ रोजी जन्मलेल्या सुमित्रा महाजन या येथेच वाढल्या. चिपळूणचे प्रसिद्ध वकील आप्पासाहेब साठे यांच्या त्या कन्या. लहानपणापासूनच सुमन साठे अभ्यासात हुशार होत्या. त्यांचे वक्तृत्व उत्तम होते. उत्तम नृत्यशैली आणि नाटकाची आवड असल्याने त्या नाटकातही काम करीत असत. शालेय जीवनात बापटआळीतील कन्याशाळेत त्यांनी शिक्षणाचे धडे गिरवले. त्यानंतर युनायटेड इंग्लिश स्कूलमधून त्या मॅट्रिक (म्हणजेच त्यावेळच्या अकरावी) झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. केशव हेडगेवार यांनी त्यांचे वडील अ‍ॅड. आप्पासाहेब साठे यांना राष्ट्रीय स्वयंसेवी संघाच्या शाखेचे संघचालक केले. पुढे ते कोकण विभागाचे संघचालक झाले. महाजन यांचे भाऊ अरुण साठे हे आसाममध्ये संघाचे प्रमुख प्रचारक होते. त्यांचे मेहुणे व एकता मासिकाचे पहिले संपादक रामदास कळसकर यांनी १९६५ मध्ये येथील लोकसभेची निवडणूक लढविली होती. २९ जानेवारी १९६५ रोजी अ‍ॅड. महाजन यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला. महाजन हे मूळचे दापोली तालुक्यातील केळशी गावचे रहिवासी. परंतु, उद्योग व्यवसायानिमित्त ते इंदोर येथे स्थायिक झाले होते. लग्नानंतर सुमित्रा महाजन इंदोरला गेल्या. तेथील विद्यापीठात वकिली करु लागल्या. लहानपणापासूनच संघाच्या प्रवाहात वाढल्याने पुढे त्या भारतीय जनता पक्षात सक्रीय झाल्या. १९८२ ते ८५ या कालावधीत नगरसेविका, तर १९८४-८५ मध्ये त्यांनी उपमहापौरपदही भूषविले. तीन वेळा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना अपयश आले. मात्र, १९८९ पासून सलग ८ वेळा त्या लोकसभेत निवडून आल्या. बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या महाजन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये महिला व बालकल्याण खात्याच्या राज्यमंत्री होत्या. चिपळूणमध्ये त्यांचे अनेक मित्र-मैत्रिणी आहेत. सरोज नेने, भरत भागवत यांच्यासारख्या अनेक मित्रांचा ऊर आज भरुन आला आहे. इंदोरमध्ये स्थायिक होऊनही चिपळूणजवळचा त्यांचा ओलावा कायम राहिला. येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. चिपळूणच्या साहित्य संमेलनातही त्यांनी सक्रीय सहभाग घेतला होता. त्यांचा ऋणानुबंध आज कायम असल्याने चिपळूणवासीयांचा सन्मान झाला आहे.