शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

जनकल्याण प्रतिष्ठानतर्फे पुणे येथे १९ एप्रिलपासून कोकण महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2018 18:32 IST

तळेरे : जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाºया कोकण महोत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ ते २२ एप्रिल या कालावधीत भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात होणार

ठळक मुद्देभोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात आयोजन

तळेरे : जनकल्याण प्रतिष्ठानच्यावतीने कोकण लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाºया कोकण महोत्सवाचे आयोजन पुणे येथे करण्यात आले आहे. हा महोत्सव १९ ते २२ एप्रिल या कालावधीत भोसरी येथील अंकुशराव नाट्यगृहात होणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी दिली. याचदरम्यान कोकण वधू-वर मेळावाही घेण्यात येणार आहे.या महोत्सवाचे उद्घाटन शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, कोकण महासंघाचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम उपस्थित राहणार आहेत. महोत्सवाची सुरुवात १९ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता शोभायात्रेने होणार आहे. या शोभायात्रेत कोकणी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. ही शोभायात्रा भोसरी येथील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून सुरू होऊन अंकुशराव लांडगे नाट्यगृहात या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. त्यानंतर सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ प्रस्तुत दशावतार कालिया मर्दनचा या कार्यक्रमाचा लाभ घेता येणार आहे. दशावतार, शक्तीतुरा, संगीत भजनाचा डबलबारी सामना, मालवणी एकांकिका अशा विविध कार्यक्रमांनी  महोत्सव रंगणार आहे.यावेळी सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमाळकर यांना कोकणभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. स्वयंवर वधू-वर सूचक वेबसाईटचे उद्घाटन नारायण राणे व भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित राहणार आहेत. समारोप रविवार २२ एप्रिलला दुपारी ३ वाजता वधू-वर मेळाव्याने होणार आहे. यावेळी आमदार भास्कर जाधव, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेवक सचिन चिखले, विरोधी पक्षनेते योगेश बहल उपस्थित राहणार आहे.कोकणी संस्कृतीसाठी विशेष आवाहनकोकणातील विविध लोकसंस्कृती, लोककला, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडविणारे स्टॉल उभारायचे असतील तर अशा व्यक्ती अथवा संस्थांनी त्वरित संपर्क साधावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय पाताडे यांनी केले आहे. अशा सर्वांना स्टॉल व राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच रविवारी ‘पावणे इले रे’ मालवणी एकांकिका सादर होणार आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गentertainmentकरमणूक