शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तर एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरची विलग सर्वोत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 11:20 IST

म्हापण ( सिंधुदुर्ग ) : युवक कला-क्रीडा मंडळ, परूळे आयोजित अ‍ॅड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय तिसाव्या एकांकिका स्पर्धेत तथास्तु ...

ठळक मुद्देराज्यस्तर एकांकिका स्पर्धेत कोल्हापूरची विलग सर्वोत्कृष्ट सांगलीला द्वितीय तर कुडाळला तृतीय क्रमांक

म्हापण (सिंधुदुर्ग) : युवक कला-क्रीडा मंडळ, परूळे आयोजित अ‍ॅड. अभयकुमार देसाई स्मृती राज्यस्तरीय तिसाव्या एकांकिका स्पर्धेत तथास्तु थिएटर्स कोल्हापूरची विलग सर्वोत्कृष्ट ठरली. समांतर संस्था सांगली यांची शेवट तितका गंभीर नाही द्वितीय तर बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळच्या दहन आख्यानने तृतीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत श्वास अ‍ॅकॅडमी कोल्हापूर यांच्या ट्राफिकला उत्तेजनार्थ तर प्रेक्षकप्रिय एकांकिका म्हणून रसिक रंगभूमी, रत्नागिरी यांची चोरी के पीछे क्या है या एकांकिकेची निवड करण्यात आली.पुरुष अभिनय-प्रथम मयुरेश पाटील (समांतर सांगली), द्वितीय तेजस मस्के (बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ), तृतीय दिवेश विचारे (कम्फर्ट दोन मुंबई).

स्त्री अभिनय-प्रथम आसावरी नागवेकर (तथास्तु थिएटर्स कोल्हापूर), द्वितीय निकिता तांबे (एम.एच. ४३ मुंबई), तृतीय प्रणाली पाटील (राजाराम बापू इन्स्टिट्यूट इस्लामपूर).

दिग्दर्शक-प्रथम उमेश बगाडे (तथास्तु थिएटर्स कोल्हापूर-विलग), द्वितीय इरफान मुजावर (समांतर संस्था सांगली-शेवट तितका गंभीर नाही), तृतीय आकाश सावंत (मुंबई-पंचावन्न आणि साठीतले प्यादे).प्रकाशयोजना-प्रथम अंकुश कुलकर्णी (तथास्तु थिएटर्स कोल्हापूर-विलग), संगीत योजना-प्रथम अनुरुप दाभाडे (विलग), नेपथ्य-प्रथम इरफान मुजावर (शेवट तितका गंभीर नाही).सर्वोत्कृष्ट विनोदी भूमिका- वैष्णवी शेटे (हिरविन),सुजाण प्रेक्षक स्पर्धा विजेता - विश्वनाथ सुरेश राऊत (परुळे) यांची निवड करण्यात आली.बक्षिस वितरणप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष युनियन बँंक सेवानिवृत्त अधिकारी विजय तुळसकर, डॉ. उमाकांत सामंत, आविनाश देसाई, सचिन देसाई, डॉ. प्रशांत सामंत, भूषण देसाई उपस्थित होते.

यावेळी शालांत परीक्षेत तालुक्यात प्रथम आलेली सिद्धी माडये व शिष्यवृत्तीधारक अर्पिता सामंत यांचा, दत्ताराम वाडेकर, शाम सामंत या ज्येष्ठांचा तसेच टेलिफोन आॅपरेटर अरविंद कोंडुरकर आणि मुख्याध्यापक प्रकाश कुलकर्णी यांचा सेवानिवृत्तपर सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रथमेश नाईक यांनी केले. निकाल वाचन व आभार अजित परुळेकर यांनी मानले. सतत ३० वर्षे या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबाबत उपस्थित मान्यवरांनी मंडळाचे कौतुक केले. 

टॅग्स :Natakनाटकcultureसांस्कृतिकsindhudurgसिंधुदुर्ग