शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कोकण कलाभूषण चंद्रकांत कदमांच्या स्मारकाचे 30 रोजी उदघाट्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 15:12 IST

कणकवली : सुप्रसिध्द भजनकार चंद्रकांत कदम उर्फ़ गुरुदास यांच्या देवगड तालुक्यातील आरे फाटा येथील स्मारकाचा उदघाट्न सोहळा ३० डिसेंबर रोजी ...

ठळक मुद्देकोकण कलाभूषण चंद्रकांत कदमांच्या स्मारकाचे 30 रोजी उदघाट्नआरे फाटा येथे कार्यक्रम ; प्रकाश पारकर यांची माहिती

कणकवली : सुप्रसिध्द भजनकार चंद्रकांत कदम उर्फ़ गुरुदास यांच्या देवगड तालुक्यातील आरे फाटा येथील स्मारकाचा उदघाट्न सोहळा ३० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती पंचायत समिती सदस्य व प्रसिध्द भजनी बुवा प्रकाश पारकर यांनी कणकवली येथे दिली.

यावेळी भजनी बुवा शशिकांत राणे, ज्ञानदेव मेस्त्री, समीर कदम, दिगंबर मेस्त्री, सुदर्शन फोपे, दीपक मुंडले, मयूर ठाकुर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त कोकण कलाभुषण सुप्रसिध्द भजनकार चंद्रकांत कदम उर्फ़ गुरुदास यांनी लोककलेतील डबलबारी भजनाला एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या स्मृतिंचे कायम स्वरूपी जतन करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र भरातील त्यांचे शिष्य तसेच गुरुदास परिवारातील सदस्यानी आरे फाटा येथे त्यांचे स्मारक उभारले आहे. यावेळी प्रकाश पारकर म्हणाले, राज्यभरात अनेक संतांची स्मारके आहेत. पण अध्यात्माचा प्रबोधन तसेच भजनाची सांगड घालून प्रसार करणाऱ्या भजनी बुवांचे स्मारक कुठेही नाही. भजनाच्या माध्यमातून अध्यात्माची आवड़ निर्माण करणाऱ्या या भजन सम्राटांची पुढील पिढीला ओळख व्हावी आणि प्रेरणा मिळावी यासाठी कोकण कलाभुषण चंद्रकांत कदम यांचे स्मारक त्यांच्या जन्मगावी आरे फाटा येथे गुरुदास चौकाच्या रूपाने  उभारले आहे.

चंद्रकांत कदम यांच्या सोबत भजन परंपरा जोपासणारे चिंतामणी पांचाळ, परशुराम पांचाळ, विलास पाटील, वामन खोपकर या भजन सम्राटांच्या आठवणी या उदघाट्न सोहळ्याच्या वेळी जागवल्या जाणार असून त्याना आदरांजली वाहण्यात येणार आहे.या स्मारकाचे उदघाट्न चंद्रकांत कदम यांच्या पत्नी गुरुमाऊली पौर्णिमा कदम यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी खासदार विनायक राऊत, आरोग्य मंत्री दीपक सावंत, आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार अड़.अजित गोगटे आदी मान्यवर उपस्थित रहाणार आहेत.

संगीत जुगलबंदी यावेळी सुप्रसिध्द गायक रुपेंद्र परब, अमित तांबुळकर , तेजस मेस्त्री यांची संगीत जुगलबंदी होणार आहे. त्याना पखवाज साथ मेहल कांडरकर व तबला साथ आबा मेस्त्री करणार आहेत. तसेच स्मारकाचे उदघाट्न झाल्यानंतर चन्द्रकांत कदम (गुरुदास) यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्यात येणार आहे.

 सुप्रसिध्द गायक विश्वास प्रभु देसाई यांचे गायन होणार असून मान्यवरांचा सत्कार झाल्यानंतर स्नेह भोजन आणि स्थानिक भजने होतील. या कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी बुवा, मृदंग मणी तसेच भजन प्रेमिनी उपस्थित रहावे असे आवाहनही प्रकाश पारकर यांनी यावेळी केले.नवोदित भजनी बुवाना प्रेरणा मिळेल !आरे फाटा येथील कोकण कलाभूषण चंद्रकांत कदम यांच्यावर असंख्य भजन रसिकांचे प्रेम होते. चंद्रकांत कदम यांच्या स्मृती या स्मारकाच्या रूपाने जपल्या जाणार असून नवोदित भजनी बुवाना त्या माध्यमातून निश्चितच प्रेरणा मिळेल, असेही प्रकाश पारकर यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग