शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, माहिम स्थानकात पॉइंट बिघाड; फास्ट ट्रॅकवरील लोकल उशीराने
2
"खाने के लाले, लडने में सबसे आगे...!" रडत-पडत कर्ज मिळवलं अन् संरक्षण बजेट २०% नं वाढवलं; दहशतवाद पोसणाऱ्या PAK चा खरा चेहरा समोर
3
Sonam Raghuvanshi : राजाच्या हत्येचा प्लॅन अयशस्वी झाला असता तर काय करणार होती सोनम? बॅकअप प्लॅन तयार
4
ट्रेन प्रवासाची चिंता मिटली! आता २४ तास आधीच मिळेल कन्फर्म सीटची अपडेट, कधीपासून लागू होणार?
5
कुणाल कपूरच्या गुड लूक्सवर चाहते फिदा, 'रामायण'च्या सेटवरचा फोटो केला शेअर? चाहते म्हणाले...
6
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
7
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
8
आजचा अग्रलेख: हे पवार, ते पवार आणि 'पॉवर'
9
एक गेली आता दुसरी आली! श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघाला ट्रॉफी जिंकण्याची संधी
10
अवघ्या ९० चेंडूत १९० धावा! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली, गोलंदाजांना फुटला घाम
11
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
12
जीप-ट्रकची भीषण टक्कर; वधुसह ५ जणांचा जागीच मृत्यू, तर वरासह ८ प्रवासी गंभीर जखमी
13
Unclaimed Bank Deposits : बँकांमध्ये ७८,२१३ कोटी रुपये बेवारस पडून! सरकार प्रत्येक जिल्ह्यात वाटणार पैसे, काय आहे योजना?
14
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
15
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
16
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
17
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
18
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
19
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
20
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."

खैदा-कातवड येथील युवकाचा काविळीच्या आजाराने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2019 11:28 IST

मालवण तालुक्यातील खैदा-कातवड येथील संतोष उर्फ बाबू शिवराम परब (३८) यांचा काविळीच्या आजाराने शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. परब यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देखैदा-कातवड येथील युवकाचा काविळीच्या आजाराने मृत्यूवैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वखर्चाने आणावे लागल्याने नाराजी

मालवण : तालुक्यातील खैदा-कातवड येथील संतोष उर्फ बाबू शिवराम परब (३८) यांचा काविळीच्या आजाराने शनिवारी सायंकाळी मृत्यू झाला. परब यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारापूर्वीच ते मृत झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, मृत परब यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करण्यासाठी कुटुंबीयांना आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना स्वखर्चाने आणावे लागल्याने रुग्णालयाच्या काराभरावर तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त करण्यात आली.खैदा-कातवड येथील संतोष परब काही दिवस आजारी होते. शनिवारी सकाळी परब हे मालवण येथील खासगी रुग्णालयात उपचार करून घरी गेले. सायंकाळी उशिरापर्यंत ते उठले नसल्याने त्यांच्या पत्नीने पाहिले व शेजाऱ्यांना माहिती दिली. त्यांनी संतोष यांना तत्काळ १०८ रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.परब यांच्या पश्चात पत्नी, आई, दोन बहिणी, भावोजी असा परिवार आहे. परब हे मालवणात गवंडी काम करून उदरनिर्वाह करायचे. परब यांच्या मृतदेहाचे रविवारी विच्छेदन करण्यात येणार होते. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील हे सुटीवर असल्याने ग्रामीण रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर आला.

याबाबत नातेवाईक व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत स्वखर्चाने आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. जाधव यांना रिक्षातून आणले. त्यानंतर मृतदेहाचे विच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन केल्यानंतर पुन्हा वैद्यकीय अधिकाऱ्यांना नातेवाईकांनी स्वखर्चाने आचरा येथे पाठविले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग