शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बाळाचे आरोग्य ठणठणीत ठेवा, वेळीच मोफत लसीकरण करा; आरोग्य विभागाचे आवाहन 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: May 14, 2024 17:08 IST

कोणत्या वयात कोणती लस.. जाणून घ्या

सिंधुदुर्ग : बालमृत्यू कमी करण्याचा तसेच बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्याचा खात्रीशीर मार्ग म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. हा एक अत्यंत सोपा असा मार्ग आहे. लसीकरणामुळे रोग होत नाही, शिवाय बाळाला रोगजंतूंशी लढण्याची उर्जा प्राप्त होत असते. त्यामुळे बाळांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी वेळेत लसीकरण करावे, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.लसीकरणामुळे बाळाच्या आजाराची तीव्रता कमी केली जाते किंवा काही आजार टाळले जाऊ शकतात. त्यामुळे आरोग्य विभागाकडून बाळाच्या जन्मापासूनच वेगवेगळ्या लसी दिल्या जातात. यामुळे बाळाची रोगप्रतिकारशक्ती वाढत असते. घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, क्षयरोग, गोवर, पोलिओ यावरील रोगप्रतिबंधक लस दिल्याने हे टाळता येते.

कोणत्या वयात कोणती लसबाळाच्या जन्मापासूनच वेगवेगळ्या लसी दिल्या जातात. बीसीजी, त्रिगुणी, पोलिओ, गोवर, टायफॉइड, हिपॅटायटीस बी, हिपॅटायटीस ए, कांजण्या, धनुर्वात, न्यूमोनिया, संयुक्त लसी असे लसींचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते वेळापत्रकानुसार बाळाला दिले जातात.

बाळाच्या आरोग्यासाठी लसीकरण आवश्यकलसीमुळे रोग निर्माण करणारे जिवाणू कमकुवत किंवा निष्क्रीय होतात. शरीरातल्या इम्यून सिस्टीम म्हणजेच रोगप्रतिकारकशक्तीवर हल्ला करणाऱ्या विषाणूला रोखण्यासाठी लस मदत करते. बाहेरून होणाऱ्या हल्ल्याला रोखण्यासाठी शरीर अँटीबॉडीज तयार करत असते. बाळ जन्माला आलं की, सर्वाधिक काळजी ही त्याच्या आरोग्याची घ्यावी लागते. बाळाला लसीकरण करण्यासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत लस उपलब्ध करून दिली आहे.

आजारापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय महत्त्वाचेदेवीसारख्या रोगाचा फैलाव कमी करण्यात लसीकरणाने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पोलिओ या आजारापासूनही लसीकरणामुळे संरक्षण मिळते. काही लसींमुळे शरीरात निर्माण होणारी रोगप्रतिकारशक्ती काही काळानंतर कमी होते. त्यामुळे ठराविक अंतराने त्या लसी पुन्हा दिल्या जातात.

लसीकरणामुळे संक्रमणाचा धोका कमीप्रसुतीपूर्व काळात मदर - टू - चाइल्ड ट्रान्समिशनमुळे होणारा हिपॅटायटीस बी विषाणू (एचबीव्ही) संसर्ग हा देशात एक चिंतेचा विषय ठरत आहे. वेळोवेळी तपासणी करून या गंभीर समस्येला प्रतिबंध करता येतो. हिपॅटायटीस बी लसीकरण करणे आवश्यक आहे.

अर्भकाला एचबीव्ही लसीचे ३ ते ४ डोस मिळावेत. ज्याचा पहिला डोस शक्यतो जन्माच्या २४ तासांच्या आत दिला जातो. एचबीव्ही पॉझिटिव्ह मातांसाठी गर्भधारणेदरम्यान व्यवस्थापन, एचबीव्ही डीएनए व्हायरल लोड चाचणी आणि एचबीव्ही संसर्गाबाबत समुपदेशन आणि वैद्यकीय व्यवस्थापन आवश्यक आहे. - डॉ. सई धुरी, जिल्हा आरोग्य अधिकारी, सिंधुदुर्ग.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग