शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर, कार्यालयासमोर शासनविरोधी निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2019 13:50 IST

कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार पासुन बेमुदत संपावर गेले आहेत.त्यामुळे कणकवली शहरातील कचरा उचलण्याच्या सेवेबरोबरच इतर सेवाही ठप्प झाल्या आहेत.

ठळक मुद्देकणकवली नगरपंचायत कर्मचारी बेमुदत संपावर, कार्यालयासमोर शासनविरोधी निदर्शनेमागण्या पूर्ण न झाल्याने आंदोलनाचा पवित्रा

कणकवली : कणकवली नगरपंचायतचे कर्मचारी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवार पासुन बेमुदत संपावर गेले आहेत.त्यामुळे कणकवली शहरातील कचरा उचलण्याच्या सेवेबरोबरच इतर सेवाही ठप्प झाल्या आहेत.महाराष्ट्र नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी संघटनेशी संलग्न असलेल्या कणकवली नगरपंचायत कर्मचारी संघटनेने हे बेमुदत संप आंदोलन पुकारले आहे.या नगरपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच शासनाचा निषेध करण्यासाठी २९ ते ३१ डिसेंबर दरम्यान काळ्या फिती लावत शासनाचा निषेध केला होता. आता आंदोलनाच्या पुढच्या टप्प्यात मंगळवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.

कणकवली नगरपंचायत अंतर्गत ५५ कंत्राटी आणि ३७ कायमस्वरूपी कर्मचारी संपावर गेले आहेत. मंगळवारी सकाळी हे सर्व कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल उर्फ़ भाई साटम यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवली नगरपंचायत कार्यालया जवळ एकत्र आले. तसेच त्यांनी निदर्शने केली. यावेळी घोषणाही देण्यात आल्या.

यावेळी संघटनेचे किशोर धुमाळे, मनोज धुमाळे, प्रवीण गायकवाड़, सतीश कांबळे, विश्वनाथ शिंदे, प्रशांत राणे, भगवान कदम आदी उपस्थित होते.या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कणकवली शहरातील नगरपंचायतीच्यावतीने देण्यात येणाऱ्या सर्व सेवा ठप्प झाल्या आहेत. मात्र, नागरिकांना या संपामुळे होणाऱ्या त्रासाबद्दल फलक लावून संघटनेने दिलगीरी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाsindhudurgसिंधुदुर्ग