शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली नगरपंचायत पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज आजपासून होणार दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 20:23 IST

कणकवली नगरपंचायतीच्या "प्रभाग 1 - क" येथील रिक्त जागेसाठी 13 डिसेंबरला पोटनिवडणूक होणार आहे.

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या "प्रभाग 1 - क" येथील रिक्त जागेसाठी 13 डिसेंबरला पोट निवडणूक होणार आहे. त्यासाठी संबधित प्रभागात आचारसंहिता जाहिर झाली असून निवडणूक कार्यक्रमानुसार शनिवार पासून उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत.कणकवलीतील प्रभाग 1 मधील नगरसेविका अड. प्रज्ञा खोत यांच्यावर अपात्रतेची कारवाई झाल्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी हि पोट निवडणूक होत आहे.कणकवली नगरपंचायतीत सध्या कार्यरत असलेल्या नगरसेवकांचा एप्रिल महिन्या मध्ये पाच वर्षाचा कार्यकाल संपणार आहे. त्यापूर्वी कणकवली नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणुक होणार आहे. त्या निवडणुकीत या पोटनिवडणुकीच्या निकालाचे प्रतिबिंब निश्चितच दिसणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.त्यामुळे त्या अनुषंगाने या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.या पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहिर झाला असून प्रथम ऑनलाईन नामनिर्देशन पत्रे भरायची आहेत. तसेच सुट्टीचा दिवस वगळून कार्यालयीन वेळेत 18 ते 24 नोव्हेंबर या कालावधीत नामनिर्देशन पत्रे भरायची आहेत. त्यानंतर 25 नोव्हेंबरला अर्जाची छाननी करण्यात येणार असून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. 30 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्यास मुदत असून उमेदवारांना दुसऱ्या दिवशी चिन्ह वाटप केले जाणार आहे. आवश्यकता भासल्यास 13 डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे.तर 14 डिसेंबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहिर केला जाणार आहे. त्यामुळे सध्या या निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्षात खलबते सुरु झाली आहेत.नगरपंचायतीच्या सध्याच्या नगरसेवकांचा कालावधी एप्रिलमध्ये संपणार आहे. त्यामुळे या पोटनिवडणुकीसाठी उच्छुक उमेदवारांची संख्या कमी आहे. तसेच राजकीय पक्ष ही पोटनिवडणुक निवडण्यास तितकेसे इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे निवडणूक होणार की नाही ? याबाबत अजूनही साशंकता आहे.