शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

....तोपर्यंत काम करू देणार नाही!, नगराध्यक्षांनी महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल 

By सुधीर राणे | Updated: December 9, 2022 16:22 IST

'महामार्ग प्राधिकरण निव्वळ कामापुरते गोड बोलून कामे उरकण्याच्या मार्गावर'

कणकवली : कणकवलीतील महामार्ग उड्डाणपुलाला जोडणाऱ्या बॉक्सेल ब्रिजच्या सर्विस रस्त्याच्या लगतच्या भिंती हटवण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्याबाबत नगरपंचायतकडे सहकार्य मागण्या करता गेलेल्या महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी अपूर्ण कामावरून खडेबोल सुनावले. तसेच कणकवली शहरवासीयांची अनेक कामे प्रलंबित असताना केवळ ठेकेदाराच्या सोयी करता बॉक्सेल ब्रिजची भिंत हटवून त्या ठिकाणी काँक्रीट प्लेट लावून तुमचे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू नका. नगरपंचायतीची  जुनी पाईपलाईन अनेकदा फोडून ती सर्विस रस्त्याखाली घालण्यात आली आहे. त्यामुळे अनेक व्यवसाय करणाऱ्या लोकांना पाणीपुरवठा करणे अडचणीचे होत आहे.

नव्याने पाईपलाईन घालून देण्याबाबत आश्वासन देऊन देखील ठेकेदार कंपनीने कोणतीही कार्यवाही केली नाही. वारंवार सूचना केल्या तरी त्याची दुरुस्ती केली जात नाही. जोपर्यंत जनतेच्या सोयीची कामे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बॉक्सेल ब्रिजचे काम सुरू करू देणार नाही असा इशारा समीर नलावडे यांनी दिला. कणकवली नगरपंचायतमध्ये नगराध्यक्ष दालनात महामार्ग प्राधिकरणचे शाखा अभियंता  साळुंखे यांच्यासह अन्य अधिकारी कर्मचाऱ्यांनी नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांची भेट घेतली. यावेळी चर्चेदरम्यान नगराध्यक्षांनी आजपर्यंत फक्त ठेकेदार कंपनी व तुम्ही आश्वासने देत आलात. मात्र,ती पूर्ण होत नाहीत तोपर्यंत बॉक्सेल ब्रिज कोसळण्याचे काम सुरू करायचे नाही असे सुनावले. महामार्ग प्राधिकरण निव्वळ कामापुरते गोड बोलून कामे उरकण्याच्या मार्गावर आहे. परंतु आता  तुमची आश्वासने ऐकून घेणार नाही. अगोदर शहरवासीयांची कामे पुरी करा व नंतरच बॉक्सेलचे पाडकाम सुरु करा अशी भूमिका नगराध्यक्ष नलावडे यांनी घेतली.  तसेच याबाबत आमदार नितेश राणे यांच्याकडे देखील तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गhighwayमहामार्ग