शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील 'चरस विक्री'चे कणकवली कनेक्शन उघड, मुंबई पोलिसांनी कणकवलीतून घेतले एकास ताब्यात 

By सुधीर राणे | Updated: October 5, 2023 11:44 IST

कणकवली: अमली पदार्थांची विक्री करणारा संशयित शौनक सुरेश बागवे (वय -२८, रा. कणकवली) याला मुंबई व कणकवली पोलिसांच्या पथकाने ...

कणकवली: अमली पदार्थांची विक्री करणारा संशयित शौनक सुरेश बागवे (वय -२८, रा. कणकवली) याला मुंबई व कणकवली पोलिसांच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करीत मोबाईल लोकेशनद्वारे ताब्यात घेतले. ही कारवाई कणकवली येथे बुधवारी रात्री करण्यात आली. त्यामुळे मुंबई येथील 'चरस विक्री'चे कणकवली कनेक्शन असल्याचे या कारवाईमुळे उघड झाले आहे. दरम्यान, कणकवली पोलिस ठाण्यात शौनक बागवे याची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. त्यानंतर त्याला मुंबई येथे नेण्यात आले. या कारवाईमध्ये कणकवली पोलिस ठाण्याचे हवालदार रवींद्र बाईत, पांडुरंग पांढरे आदी सहभागी झाले होते.मुंबई येथील आझाद मैदान पोलिस स्थानकात ९ सप्टेंबर २०२३ रोजी अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी यापूर्वी चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासाअंती या प्रकरणात अन्य संशयितांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. यातील शौनक बागवे हा संशयित कणकवलीत असल्याचे लोकेशन मुंबई पोलिसांना मिळत होते. त्यानुसार मुंबई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस पथक बुधवारी कणकवलीत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी कणकवली पोलिसांच्या मदतीने शौनक याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तो राहत असलेल्या आचरा महामार्गलगत असलेल्या एका कॉम्पलेक्समध्ये तिसऱ्या मजल्यावर असलेल्या रुमच्या ठिकाणी ते गेले असता शौनक तेथे नव्हता. मात्र, त्याचे वडील तिथे होते. पोलिसांनी त्यांच्याजवळ शौनक कुठे आहे, याबाबत विचारणा केली. मात्र, त्यांच्याकडून विसंगत उत्तरे मिळाल्याने पोलिसांनी त्यांचा मोबाईल जप्त केला. त्यानंतर पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी शौनकला पडकण्यासाठी सापळा रचला. रात्री ८.३० वाजता शहरातील एका हॉटेलमधून तो बाहेर पडला. तो आपल्या राहत्या ठिकाणी पोहोचत असतानाच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. शौनक यापूर्वी मुंबईत अमली पदार्थांची विक्री करत होता. सध्या तो आचरा महामार्गालगत असलेल्या एका कॉम्पलेक्स राहत होता. या कारवाईमुळे कणकवलीतही अमली पदार्थांची विक्री करणारे रॅकेट सक्रीय असल्याचा संशय पोलिसांना असून त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखीन काही आरोपींचा मुंबई पोलिस शोध घेत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMumbaiमुंबईPoliceपोलिस