शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

कणकवली पर्यटन महोत्सवाची उद्यापासून धूम! दिग्गज कलाकारांची मांदियाळी

By सुधीर राणे | Updated: January 4, 2023 16:43 IST

रसिकांसाठी एक महापर्वणीच

कणकवली: कणकवलीत ५ ते ८ जानेवारी या कालावधीत होणाऱ्या कणकवली पर्यटन महोत्सवाची रुपरेषा जाहीर करण्यात आली आहे. या महोत्सवात नामवंत कलाकारांची मांदियाळी असणार आहे. महोत्सवाचे ५ जानेवारी रोजी सायंकाली ७ वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते उपजिल्हा रुग्णालया समोरील मैदानावर उदघाटन होणार आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांची धूम अनुभवता येणार असून रसिकांसाठी ती एक महापर्वणीच असणार आहे. या पर्यटन महोत्सवाचा समारोप ८ जानेवारी रोजी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. तर महोत्सवाच्यानिमित्ताने सिने टीव्ही कलाकारांचे कार्यक्रम, फूडफेस्टिव्हल, स्थानिक कलाकारांचे कार्यक्रम यामुळे चार दिवस कणकवलीवासियांना एक मनोरंजनाची मेजवानीच मिळणार आहे. ५ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता पटकीदेवी मंदिर ते मुख्य चौकातून महोत्सव स्थळापर्यंत शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तसेच चित्ररथ स्पर्धा घेतली जाणार आहे. याचवेळी महोत्सव स्थळी फूड फेस्टिव्हलचेही उद्घाटन होणार आहे. सायंकाळी ६ वाजता किडस् फॅशन शो होणार आहे. यानंतर बेधुंद धमाल कॉमेडी शो व ऑर्केस्टा होणार आहे. यामध्ये मराठीतील आघाडीचे विनोदवीर प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, श्यामसुंदर राजपूत, चेतना भट, गायक कविता राम, अमृता नातू फेम विश्वजीत बोरगावकर यांच्या सुपरहीट कलेचा आनंद लुटता येणार आहे. या कार्यक्रमाचे निवेदन ऐश्वर्या पवार करणार आहे.६ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता ज्येष्ठ नाट्यकर्मी सुहास वरुणकर, हरिभाऊ भिसे, संजय मालंडकर यांच्या संकल्पनेतून स्थानिक कलाकारांचा 'कनकसंध्या कलाविष्कार' हा कार्यक्रम होणार आहे. ७ रोजी सायंकाळी ७.३० वाजता भाई साटम आणि ५० सहकारी 'मनी आहे भाव, देवा मला पाव' हा आध्यात्मिक आणि विनोदी कार्यक्रम. सादर करणार आहेत. रात्री ८ वाजता सेलिब्रेटी कलाकारांचा जल्लोष व नृत्य, गायनाचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये पार्श्वगायिका वैशाली माडे, स्वप्नील गोडबोले, इंडियन आयडॉल फेम सायली कांबळे यांच्या गायनासोबतच हेमलता बाणे, लावणीसम्राज्ञी विजया कदम यांचे नृत्य होणार आहेत. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कलाकार दिगंबर नाईक व हेमांगी कवी करणार आहेत.महोत्सवाचा समारोप  ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. यावेळी केंद्रीयमंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तर रात्री ८ वाजता ख्यातनाम गायक, अनेक गायन कार्यक्रमांचे परीक्षण करणारे जावेद अली  यांचा 'तेरी झलक..' हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमांचा नागरीकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे तसेच सर्व नगरपंचायत सदस्यांनी केले आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली