शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

फोंडाघाटमध्ये कणकवली पोलिसांची अवैध दारूवर कारवाई, ३२ हजाराच्या दारूसह मुद्देमाल जप्त

By सुधीर राणे | Updated: October 11, 2022 11:47 IST

कणकवली : कणकवली तालुक्यात फोंडाघाट येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात तब्बल ३२ हजार ५८० रुपयांची अवैध गोवा बनावटीची ...

कणकवली : कणकवली तालुक्यात फोंडाघाट येथे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार टाकलेल्या छाप्यात तब्बल ३२ हजार ५८० रुपयांची अवैध गोवा बनावटीची दारू व १५ हजार रुपये किमतीचा पत्र्याचा स्टॉल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. काल, सोमवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी संशयित रामचंद्र उर्फ बाबू तांबे (फोंडाघाट, हवेलीनगर) याच्या विरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार किरण मेथे यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.या कारवाईत रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ७ बाटल्या, मॅकडॉल नंबर १व्हिस्कीच्या ३२ बाटल्या, हनी ब्लेंड प्युअर ब्रँडी असे लेबल असलेल्या गोवा बनावटीच्या ७२ बाटल्या, हायवड फाईन व्हिस्कीच्या  ६१ बाटल्या, बॉब्स लेमन होडका ३० बाटल्या, रोमॅनो होडक्याच्या ३२ बाटल्या, गोल्डन आईस ब्लू फाईन व्हिस्कीच्या १३ बाटल्या, मेक डॉल नंबर १रमच्या १० बाटल्या, एक पत्र्याचा स्टॉल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास फोंडाघाट दुरक्षेत्राचे हवालदार उत्तम  वंजारे करीत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी